पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ ५ फेब्रुवारीला

By Admin | Updated: January 27, 2015 23:50 IST2015-01-27T23:50:10+5:302015-01-27T23:50:10+5:30

एक हजार पन्नास विद्यार्थ्यांना होणार पदवी प्रदान; राज्यपाल, मुख्यमंत्री, कें द्रीय कृषिमंत्री आणि राज्याचे कृषिमंत्री निमंत्रीत.

Panjabrao Deshmukh Agricultural University's graduation ceremony will be held on 5th February | पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ ५ फेब्रुवारीला

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ ५ फेब्रुवारीला

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा २९ वा पदवीदान समारंभ येत्या ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या समारंभाला राज्यपाल सी. व्ही. राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कें द्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह आणि राज्याचे कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांना कृषी विद्यापीठाने निमंत्रण दिले आहे. यावर्षी विविध विषयांच्या १0५३ पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाईल. या समारंभासाठी कृषी विद्यापीठात जय्यत तयारी होत आहे.
कृषिशास्त्र, उद्यानविद्या, वनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३३,३५६ विद्यार्थ्यांनी पदवी ग्रहण केली आहे. त्यामध्ये पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी २५,४१४, तर ७,४३४ पदव्युत्तर आणि ५0८ विद्यार्थ्यांना पीएचडी ही पदवी प्राप्त केली आहे. यावर्षी एकूण १,५७0 विद्यार्थ्यांनी हे विविध अभ्यासक्रम पूर्ण केले. यातील १0५३ विद्यार्थ्यांना ५ फेब्रुवारी रोजी होणार्‍या पदवीदान समारंभात प्रत्यक्ष उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान केली जाणार आहे.
पदवीदान समारंभाला उपस्थित राहण्यासाठी राज्यपाल सी. व्ही. राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कें द्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह आणि या राज्याचे कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांना कृषी विद्यापीठाने निमंत्रण दिले आहे. यापैकी समारंभाला कोण येणार, याकडे विद्यार्थी आणि शास्त्रज्ञ, शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

*राज्यपालांची प्रतीक्षा
राज्यपाल कृषी विद्यापीठाचे कुलपती असल्याने त्यांच्या हस्ते पदवी ग्रहण करणे विद्यार्थ्यांसाठी भूषणावह आहे. तथापि, गत दहा ते बारा वर्षांपासून या कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ राज्यपालांच्या अनुपस्थितीतच पार पडला. त्यामुळे यावेळी विद्यार्थ्यांना राज्यपालांची प्रतीक्षा आहे.

Web Title: Panjabrao Deshmukh Agricultural University's graduation ceremony will be held on 5th February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.