शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
प्रशांतचा प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार, 'मी आत्महत्या करेन' असे मेसेज करत संपवलं जीवन! नवीन खुलासा
3
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
4
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
5
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
6
मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही; मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ जणांवर कारवाईचा बडगा
7
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
8
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
9
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
10
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
11
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
12
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
13
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
14
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
15
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
16
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
17
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
18
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
19
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
20
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण

नागपुरात  राष्ट्रवादीच्या मदतीने उंचावला 'हात' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 21:08 IST

लोकसभा निवडणुकीत नागुपरात राष्ट्रवादीने काँग्रेसला साथ दिली. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही अख्खी राष्ट्रवादी आघाडी धर्माचे पालन करीत काँग्रेसचा ‘हात’ उंचावण्यासाठी मैदानात उतरल्याचे पहायला मिळाले.

ठळक मुद्देप्रकाश गजभिये, अहीरकर, पेठे, पडोळे, आर्य यांच्यासह राष्ट्रवादी उतरली प्रचारात : लोकसभेप्रमाणे विधानसभेतही दिली साथ

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या निवडणुकीत आघाडीत बिघाडी झाली. राष्ट्रवादीने काँग्रेसच्या विरोधात शड्डू ठोकला. मात्र, लोकसभा निवडणुकीत नागुपरात राष्ट्रवादीने काँग्रेसला साथ दिली. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही अख्खी राष्ट्रवादी आघाडी धर्माचे पालन करीत काँग्रेसचा ‘हात’ उंचावण्यासाठी मैदानात उतरल्याचे पहायला मिळाले.नागपूर शहरात राष्ट्रवादीचा एकही उमेदवार रिंगणात नव्हता. पण राष्ट्रवादीने त्याचा मुद्दा केला नाही. पश्चिम नागपुरात राष्ट्रवादीचे आ. प्रकाश गजभिये यांनी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना मोलाची साथ दिली. २००९ मध्ये पश्चिम नागपुरात अनीस अहमद हे काँग्रेसचे उमेदवार असताना प्रकाश गजभिये हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. त्यावेळी गजभिये यांनी सुमारे २५ हजार मते घेतली होती. त्यामुळे अहमद यांचा सुमारे १८०० मतांनी पराभव झाला होता. यावेळी मात्र, गजभिये हे पूर्ण ताकदीने काँग्रेसच्या पाठिशी उभे राहिले. हिलटॉप, पांढराबोडी, अमरावती रोड या भागात गजभिये यांनी स्वत: महापालिकेच्या निवडणुकीत उभे असल्यासारखा गल्लीबोळात फिरून प्रचार केला. मतदारांना आकर्षित करण्यासाठी गळ्यात संदलचा ढोल टाकून बडवला. मतदारांच्या पाया पडले. गरिबांच्या झोपडीत जेवनही केले. राष्ट्रवादीला साथ द्या, काँग्रेसला ‘हात’ द्या, अशी विनवनी मतदारांना केली. विकास ठाकरे हे महापौर असताना प्रकाश गजभिये हे उपमहापौर होते. या जोडीने महापालिका गाजवली होती. तेव्हापासून ही जोडी चर्चेत आहे. या निवडणुकीत गजभिये यांनी पुन्हा एकदा दोस्ती निभवली.उत्तर नागपुरातही प्रकाश गजभिये यांची नितीन राऊत यांना मदत झाली. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष वेदप्रकाश आर्य यांनीही यावेळी सामंजस्याची भूमिका घेत राऊत यांच्यासाठी जंग जंग पछाडले. पूर्व नागपूरची जागा राष्ट्रवादीला न सोडण्यात आल्यामुळे गटनेते दुनेश्वर पेठे सुरवातीला नाराज झाले होते. मात्र, नंतर आघाडीची प्रत्येक जागा महत्वाची असल्याचे सांगत ते काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे यांच्या प्रचारात उतरले. दक्षिण नागपुरात माजी आ. दीनानाथ पडोळे यांनी काँग्रेसचे गिरीश पांडव यांच्या प्रचारात पुढाकार घेतला. तर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अनिल अहीरकर यांनी संपूर्ण राष्ट्रवादी ताकदीने काँग्रेसच्या पाठीशी कशी उभी करता येईल, यासाठी नियोजन केले. त्यामुळे काँग्रेसला मिळालेल्या यशात राष्ट्रवादीचे योगदान आहे, हे नाकारता येणार नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस