अनोळख्या मोबाईल कॉल्सची दहशत
By Admin | Updated: April 25, 2015 02:14 IST2015-04-25T02:14:32+5:302015-04-25T02:14:32+5:30
शहरातील मोबाईल फोनधारक गेल्या काही दिवसांपासून अनोळखी व बोगस मोबाईल कॉल्सच्या दहशतीत जगत आहेत.

अनोळख्या मोबाईल कॉल्सची दहशत
नागपूर : शहरातील मोबाईल फोनधारक गेल्या काही दिवसांपासून अनोळखी व बोगस मोबाईल कॉल्सच्या दहशतीत जगत आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय स्टॅर्ण्डर्ड कोड (आयएसडी) नंबरवरून कॉल्स येत आहेत. ते कॉल्स रिसीव्ह करणे म्हणजे धोकादायक आहे. हे कॉल प्लस ३८१ आयएसडी नंबर (सर्बिया)सह प्लस ००००१२३४५६ या क्रमांकावरूनही येत आहेत.
या प्रकरणाचा तपासासाठी टेलिफोन रेग्युलेटरी अॅथॉरिटी आॅफ इंडिया (ट्राय) बंगलुरु येथील सिनियर रिसर्च आॅफिसर के. मुरलीधर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, भारतात असा कुठलाही मोबाईल फोन आॅपरेटर नाही ज्यांचा क्रमांक प्लस ३८१ आणि प्लस ०००० पासून सुरू होतो. या क्रमांकाचे कॉल्स विदेशातील असू शकतात. त्यामुळे ग्राहकांनी अशा क्रमांकावरून फोन आल्यास त्याला उचलू नये. ट्राय आपल्या स्तरावर या क्रमांकाची सत्यता तपासून पाहील. तसेच स्थानिक सत्रावर बीएसएनएलचे जनसंपर्क अधिकारी टी.बी. वानखेडे यांनीसुद्धा या प्रकरणी ग्राहकांना अनोळखी कॉल्स रिसिव्ह न करण्याचा सल्ला दिला आहे.