शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय आणि न्यायव्यवस्थेवर प्रस्थापितांची दहशत : रेखा ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:37 IST

प्रस्थापित जातीविरोधात छेडछाड केली तर कायदा हातात घेऊन धडा शिकवू, असा संदेश देणारी ही मनुवादी व्यवस्था आहे. यावरून राजकीय व न्यायव्यवस्थेवर आजही प्रस्थापितांची दहशत असून पोलीस यंत्रणा व प्रशासकीय व्यवस्था त्यांच्यानुसारच काम करीत असल्याचे मनोगत प्रसिद्ध विचारवंत रेखा ठाकूर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देएससीएस व्याख्यानमालेला सुरुवात

लोेकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोपर्डीच्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली. एका मुलीला न्याय मिळाला याचा आनंद आहेच. साक्षीदार नसूनही वर्चस्व असलेल्या जातीच्या मूकमोर्चामुळे या घटनेत न्याय मिळाला. दुसरीकडे अनेक साक्षीदार असूनही खर्डा येथील नितीन आगेच्या आरोपींना सबळ पुराव्याअभावी सोडून देण्यात आले. या न्यायात समता नाही. प्रस्थापित जातीविरोधात छेडछाड केली तर कायदा हातात घेऊन धडा शिकवू, असा संदेश देणारी ही मनुवादी व्यवस्था आहे. यावरून राजकीय व न्यायव्यवस्थेवर आजही प्रस्थापितांची दहशत असून पोलीस यंत्रणा व प्रशासकीय व्यवस्था त्यांच्यानुसारच काम करीत असल्याचे मनोगत प्रसिद्ध विचारवंत रेखा ठाकूर यांनी व्यक्त केले.संत चोखामेळा समाज (एस.सी.एस.) मुलींची शिक्षण संस्थाच्यावतीने आयोजित एस.सी.एस. व्याख्यानमालेला शनिवारी रेखा ठाकूर याच्या व्याख्यानाने सुरुवात झाली. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. रणजित मेश्राम हे होते. याप्रसंगी प्रसिद्ध विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे, संस्थेचे सचिव पवन गजभिये, सदस्या वत्सलाबाई मेश्राम, दिगंबर हिरेखण, संदीप डोंगरे, कार्यक ारी मुख्याध्यापिका शारदा गेडाम, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका अंजली मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.‘महात्मा जोतिराव फुले ते कोपर्डी व्हाया खर्डा’ या विषयावर रेखा ठाकूर यांनी विचार मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वगळता महात्मा फुले यांचा वारसा कुणीही प्रामाणिकपणे चालविला नाही. महात्मा फुले व सावित्रीबार्इंनी बहुजनांच्या अधोगतीचे कारण असलेल्या मनुवादी व्यवस्थेविरोधात सत्यशोधक चळवळ उभी केली. त्यांच्यानंतर ब्रिटिशांच्या राजवटीत ब्राह्मण समाजसुधारकांनी काळाची पावले ओळखून आणि केवळ प्रशासनात वर्चस्व प्राप्त करण्यासाठी मुलांना व स्त्रियांना शिक्षणासाठी प्रवृत्त केले. हा महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रवाह असला तरी यात बहुजन समाज व त्यातील स्त्रियांना स्थान दिले नाही. यानंतर ब्राह्मणेत्तर समाजसुधारकांनी महात्मा फुल्यांचा वारसा स्वीकारला खरा, मात्र त्यात सत्यशोधक विचारांची समतावादी भूमिका नव्हती. कारण पारंपरिक वर्चस्वाच्या भावनेतून वर्णव्यवस्थेची उतरंड तोडायची नव्हती. पुढे या चळवळीने सत्ताकारणाचे ध्येय स्वीकारत चळवळ संपविली. दलित व बहुजन समाजाला सोईस्करपणे परिघाबाहेर ठेवून स्वातंत्र्यानंतर ५० वर्षे सत्ता उपभोगली. ही सत्ता केवळ घराणेशाहीपुरती मर्यादित राहिली व सामान्य मराठा समाज भरडला गेला. कोपर्डीच्या घटनेतून सामान्य समाजाचा असंतोष उफाळला. मात्र दुर्दैवाने यामागेही समता व बंधुत्वाची प्रेरणा नव्हती तर हा असंतोष आरक्षण व अ‍ॅट्रासिटी विरोधातच गेला.

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर