शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

खवल्या मांजराची शिकार, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 20:36 IST

वन्यजीवांच्या यादीमध्ये दुर्मिळ असलेल्या खवल्या मांजर या प्राण्याची शिकार केल्याची घटना पेंच व्याघ्र प्रकल्पात घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून शिजविण्यास घातलेला हा प्राणीही जप्त करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वन्यजीवांच्या यादीमध्ये दुर्मिळ असलेल्या खवल्या मांजर या प्राण्याची शिकार केल्याची घटना पेंच व्याघ्र प्रकल्पात घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून शिजविण्यास घातलेला हा प्राणीही जप्त करण्यात आला आहे.पेंच व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या चोरबाहुली वनपरिक्षेत्रात किरंगीसर्रा उत्तर कक्ष क्रमांक ५५४ मध्ये हा प्रकार उघडकीस आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावाशेजारील भागात गस्त वाढविण्यात आली आहे. या माध्यमातूनच वनविभागाला या गुन्ह्याची माहिती मिळाली. १८ मे रोजी किरंगीसर्रा या गावातील काही इसमांनी खवले मांजर (अनुसूची एक) या वन्यप्राण्याची शिकार केल्याची गोपनीय माहिती पूर्व पेंच वनपरिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. या गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला असता गावाजवळच्या राजू रामजी धुर्वे यांच्या शेतातील घराच्या बाहेर खवल्या मांजर चुलीवरच्या पातेल्यामध्ये शिजवत घातल्याचे दिसून आले. वनविभागाच्या पथकाने पातेल्यासह प्राणी जप्त करून राधेश्याम ओडगू आहाके, कवडू उदाराम धुर्वे यांना चौकशीकरिता ताब्यात घेतले. प्राण्याची शिकार करून त्याचे मांस खाण्यासाठी तयारी केल्याची कबुली या आरोपींनी दिली. त्यावरून दुसऱ्या दिवशी दोघांवरही भारतीय वन अधिनियम १९२७ व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी चोरबाहुली प्रदीप संकपाळ, प्रतीक मोडवान आणि मंगेश ताटे हे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीforestजंगल