धमाकेदार नृत्याने रंगली प्राथमिक फेरी

By Admin | Updated: November 25, 2014 00:52 IST2014-11-25T00:52:09+5:302014-11-25T00:52:09+5:30

लोकमत कॅम्पस क्लबचा वार्षिक सोहळा ‘बालोत्सव-२०१४’ची प्राथमिक फेरी धमाकेदार नृत्यांनी रंगली. याला बालगोपालांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकमत कॅम्पस क्लब, यमसनवार संस्कृत

Pamphlet primary round played | धमाकेदार नृत्याने रंगली प्राथमिक फेरी

धमाकेदार नृत्याने रंगली प्राथमिक फेरी

कॅम्पस क्लबचा वार्षिक सोहळा : बालगोपालांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर : लोकमत कॅम्पस क्लबचा वार्षिक सोहळा ‘बालोत्सव-२०१४’ची प्राथमिक फेरी धमाकेदार नृत्यांनी रंगली. याला बालगोपालांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकमत कॅम्पस क्लब, यमसनवार संस्कृत क्लासेस आणि पेस आयआयटी व मेडिकल प्रस्तुत या बालोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम फेरी १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता साई वाटिका लॉन, बजाजनगर येथे होईल.
बालोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या आंतरशालेय समूहनृत्य, एकलनृत्य स्पर्धेच्या प्राथमिक स्पर्धेत ६ ते ९ (‘अ’ गट) व १० ते १४ (‘ब’ गट) या वयोगटातील बालकलावंतांनी धमाल केली. अनेक चिमुकल्या कलावंतांनी आपल्या प्रतिभेने परीक्षकांची दाद घेतली. समूहनृत्य प्रकारात तर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वेगवेगळ्या संकल्पना रसिकांना आश्चर्यचकित करणाऱ्या होत्या. यातील उत्कृष्ट कलावंतांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली. यामुळे ही फेरी कलाविष्काराने तुफान रंगणार आहे. या स्पर्धेचे परीक्षण कविता भोयर-माहुरतुडे, अंकिता जांगलेकर, निशा ठाकूर यांनी केले. १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत विविध खेळ, मनोरंजन, विविध व्यंजनांचे स्टॉल्स, पुरस्कार वितरण आदी खास आकर्षण असणार आहे. स्टॉल बुकिंगकरिता लोकमत कॅम्पस क्लब, लोकमत भवन रामदासपेठ येथे प्रत्यक्ष किंवा ९८२२४०६५६२ किंवा २४२९३५५ या क्रमांकावर संपर्क साधावा. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांनीही लोकमत कॅम्पस क्लब कार्यालयात संपर्क साधावा.(प्रतिनिधी)
अंतिम फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांची नावे
समूह नृत्य स्पर्धा - ‘अ’गट : न्यू डायमंड इंग्लिश स्कूल, श्री हरिकिशन पब्लिक स्कूल, न्यू डायमंड स्कूल, एन्जल आणि डेव्हिल ग्रुप.
‘ब’ गट : नारायणा विद्यालय, नारायण इसेस इंटरनॅशनल स्कूल, श्री हरिकिशन पब्लिक स्कूल, टिपटॉप कॉन्व्हेंट आणि अक्षय नृत्य सम्राट ग्रुप.
एकल समूहनृत्य स्पर्धा -‘अ’गट : फाल्गुनी भानरकर, धनश्री द्विवेदी, अदिती सिंघम, संस्कृती राजूरकर, डिम्पल बैस, जान्हवी सोमकुंवर, श्रेया तायवाडे, सुहानी रेगारे, कात्यायनी सिंग, साक्षी शिरभैया, तनिष्का सुटे, चिन्मय भुटे.
‘ब’गट : श्लोक पोहनकर, वैभव निकम, अर्जुन नायर, मैत्रेयी इंगळे, यश कपटा, पायल गायकवाड, श्रुदाणी मस्के, समीक्षा साहारे, जान्हवी, श्रुती मस्के, तन्मयी सिकंदर, श्रुचिका रेवतकर, अबोली तलावार आदींची निवड करण्यात आली.

Web Title: Pamphlet primary round played

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.