शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

मेडिट्रिनाच्या पालतेवाराची पोलिसांनाही भूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:18 IST

रंभी मित्र, नंतर भागीदार त्यानंतर रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक आणि शासकीय यंत्रणेला भूल देणारे मेडिट्रिना हॉस्पिटलचे डॉ. समीर पालतेवार यांनी पोलिसांनाही भूल दिली आहे. सात दिवस होऊन आणि डॉ. पालतेवारांचा पत्ता, संपर्क माहीत असूनही पोलीस त्यांना अटक करण्याऐवजी हातावर हात धरून बसले. त्यामुळे डॉ. पालतेवारने पोलिसांना भूल दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ठळक मुद्देअटक करण्यासाठी टाळाटाळ : कारण गुलदस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रारंभी मित्र, नंतर भागीदार त्यानंतर रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक आणि शासकीय यंत्रणेला भूल देणारे मेडिट्रिना हॉस्पिटलचे डॉ. समीर पालतेवार यांनी पोलिसांनाही भूल दिली आहे. सात दिवस होऊन आणि डॉ. पालतेवारांचा पत्ता, संपर्क माहीत असूनही पोलीस त्यांना अटक करण्याऐवजी हातावर हात धरून बसले. त्यामुळे डॉ. पालतेवारने पोलिसांना भूल दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाला संबंधित डॉक्टर भूल देतात. त्यामुळे काय होत आहे, ते रुग्णाच्या लक्षात येत नाही. डॉ. पालतेवार यांनीरुग्णांचे नातेवाईक आणि शासकीय यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक करून कोट्यवधी रुपयांचा अपहार केला. पालतेवारांच्या देखरेखीत चाललेल्या मेडिट्रिना हॉस्पिटलमधील फसवणुकीची ठोस पुराव्यानिशी तक्रार गणेश चक्करवार या त्यांच्या भागीदारांनी सहा महिन्यांपूर्वी केली. मात्र, ठोस पुरावे असूनही गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने गुन्हा दाखल करण्याचे टाळले. त्यामुळे चक्करवार यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणात पोलिसांना २३ जानेवारीपर्यंत कारवाईचे निर्देश दिले. त्यामुळे पोलिसांनी २२ जानेवारीला डॉ. समीर पालतेवारविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला आता सात दिवस झाले. या सात दिवसात डॉ. पालतेवारांनी केलेल्या फसवणुकीची अनेक प्रकरणे आणि स्वतंत्र तक्रारीही पुढे आल्या. रुग्णांच्या नातेवाईकांसोबतच पालतेवारांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत अपहार केला. रुग्णांकडून बेकायदा रक्कम उकळली, बनावट नोंदी(व्हाऊचर)द्वारे हॉस्पिटलच्या खात्यातून पैसे काढले आणि बोगस दस्तावेज बनवून फसवणूक करण्याचाही सपाटा डॉ. पालतेवार यांनी लावल्याचेही उजेडात आले. पोलिसांनी डॉ. पालतेवारांच्या रुग्णालयातील कार्यालयात, निवासस्थानी, त्यांच्या काही साथीदारांकडे झाडाझडती घेतली. रुग्णालयातील लेखा विभागातून महत्त्वाची कागदपत्रे, संगणक, हार्डडिस्क जप्त केली. मात्र, एवढे सर्व करूनही पोलिसांनी पालतेवारांना अटक करण्यासाठी कचखाऊ भूमिका वठविल्याने पालतेवारांनी पोलिसांनाही ‘भूल’ दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.आज निर्णय होणार?डॉ. पालतेवार यांनी स्वत:ची अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणूनही अर्ज सादर केला आहे. आधी सोमवारी होणार होती. मात्र, त्यावर मंगळवारी सुनावणी होईल, असे ठरले. त्यानुसार, न्यायालयात दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद झाला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीश अली यांनी निर्णय राखून ठेवला. बुधवारी यासंबंधाने निर्णय होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Policeपोलिसhospitalहॉस्पिटल