शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
3
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
4
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
6
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
7
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
8
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
9
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
11
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
12
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
13
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
14
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
15
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
16
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
17
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
18
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 
19
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
20
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही

नागपुरात भरधाव ट्रकने घेतला पेंटरचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 9:14 PM

भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे एका पेंटरचा करुण अंत झाला. तर त्याचा मित्र जखमी झाला. गुरुवारी दुपारी १.३० ते १.५० च्या दरम्यान यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागनदी पुलाजवळ हा भीषण अपघात घडला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे एका पेंटरचा करुण अंत झाला. तर त्याचा मित्र जखमी झाला. गुरुवारी दुपारी १.३० ते १.५० च्या दरम्यान यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागनदी पुलाजवळ हा भीषण अपघात घडला. दीपक तुकाराम खांडेकर (वय ५०) असे मृताचे नाव असून तो न्यू इंदोरा गल्ली नंबर ४ मध्ये राहत होता. दीपक पेंटर होता. नेहमीप्रमाणे तो त्याचा मित्र कमलेश नारायण बोंबले याच्यासोबत आज सकाळी पेंटिंग करायला गेला होता. दुपारी १.३० च्या सुमारास हे दोघे हिरोहोंडा दुचाकीने परत येत असताना ट्रक क्रमांक सीजी ०७ / सीए २४६४ च्या चालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून कमलेश बोंबलेच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे मागे बसलेल्या दीपक खांडेकरचा मृत्यू झाला तर कमलेश बोंबले जबर जखमी झाला. या अपघातामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळाल्यानंतर यशोधरानगर पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी तेथून खांडेकरचा मृतदेह हलवून मेयोत पाठविला. आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू