नागपुरात भरधाव ट्रकने घेतला पेंटरचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 09:14 PM2020-06-25T21:14:46+5:302020-06-25T21:15:54+5:30

भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे एका पेंटरचा करुण अंत झाला. तर त्याचा मित्र जखमी झाला. गुरुवारी दुपारी १.३० ते १.५० च्या दरम्यान यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागनदी पुलाजवळ हा भीषण अपघात घडला.

Painter's victim killed by truck in Nagpur | नागपुरात भरधाव ट्रकने घेतला पेंटरचा बळी

नागपुरात भरधाव ट्रकने घेतला पेंटरचा बळी

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे एका पेंटरचा करुण अंत झाला. तर त्याचा मित्र जखमी झाला. गुरुवारी दुपारी १.३० ते १.५० च्या दरम्यान यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागनदी पुलाजवळ हा भीषण अपघात घडला. दीपक तुकाराम खांडेकर (वय ५०) असे मृताचे नाव असून तो न्यू इंदोरा गल्ली नंबर ४ मध्ये राहत होता. दीपक पेंटर होता. नेहमीप्रमाणे तो त्याचा मित्र कमलेश नारायण बोंबले याच्यासोबत आज सकाळी पेंटिंग करायला गेला होता. दुपारी १.३० च्या सुमारास हे दोघे हिरोहोंडा दुचाकीने परत येत असताना ट्रक क्रमांक सीजी ०७ / सीए २४६४ च्या चालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून कमलेश बोंबलेच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे मागे बसलेल्या दीपक खांडेकरचा मृत्यू झाला तर कमलेश बोंबले जबर जखमी झाला. या अपघातामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळाल्यानंतर यशोधरानगर पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी तेथून खांडेकरचा मृतदेह हलवून मेयोत पाठविला. आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Painter's victim killed by truck in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.