स्वरातून मांडल्या शेतकºयांच्या वेदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:34 IST2017-10-09T01:34:28+5:302017-10-09T01:34:38+5:30
शेतकºयांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. अस्मानी व सुल्तानी संकटाशी रोज दोन हात करणारा हा लढवय्या शेतकरी अखेर निराश मनाने स्वत:ला संपवत सुटला आहे.

स्वरातून मांडल्या शेतकºयांच्या वेदना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकºयांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. अस्मानी व सुल्तानी संकटाशी रोज दोन हात करणारा हा लढवय्या शेतकरी अखेर निराश मनाने स्वत:ला संपवत सुटला आहे. त्याच्या मागे त्याच्या कुटुंबाची पार वाताहत होत आहे. अशा निराश शेतकºयांच्या मनात आशावाद पेरण्यासोबतच आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी जनमंच या सामाजिक संस्थेतर्फे रविवारी संध्याकाळी शंकरनगरातील साई सभागृहात ‘जाने नही देंगे तुझे’ या विशेष सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सागर मधुमटके, श्रुती चौधरी, अरविंद पाटील, मनोहर रडके, रेणुका इंदूरकर या गायकांनी आपल्या गोड आवाजात मधूर गाणी सादर केली. राजेश किलोर यांची संकल्पना असलेल्या व ‘फायर’ या शीर्षकांतर्गत आपला पहिलाच कार्यक्रम घेऊन रसिकांपुढे येणाºया या ग्रुपने अतिशय सुंदर सुरुवात केली. राजेश किलोर यांच्या ‘तू हैं आसमा, ये तेरी जमी हैं...’ या गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. मनोहर रडके यांच्या ‘तुझ से नाराज नाही जिंदगी...’ या गीतानेही रिझवले. श्रुती चौधरी या गुणी गायिकेने अतिशय तयारीने गायलेले ‘सून रहा हैं ना तू...’ हे गीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेले. यानंतर मंचावर आला सागर मधुमटके. ‘रूक जाना नही तू कही हार के...’ हे त्याचे गीत शेतकºयालाच समर्पित होते. त्याने गायलेले ‘दिये जलते हैं...’ हे गाणेही कर्णप्रिय ठरले.
अरविंद पाटील यांनी ‘मै पल दो पल का शायर हूं...’ आपल्या खास शैलीत गायले. डॉ. रेणुका इंदूरकर हिची ‘आज जाने की जिद ना करो...’ ही गझल श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेली. कार्यक्रमाचे बहारदार निवेदन श्वेता शेलगांवकर यांनी केले. या गोड गळ्याच्या गायकांना की-बोर्डवर रॉबिन विलियम, प्रशांत मिसर, गिटार-प्रकाश चव्हाण, बेस गिटार-रिंकू निखार, वसंत भट, आॅक्टोपॅड-अक्षय हर्ले, तबला-श्रीकांत सूर्यवंशी व ढोलकवर अनिकेत याने सुरेल सहसंगत केली.
७ जानेवारीला शेतकरी मेळयाव्यात वाटणार निधी
या कार्यक्रमाद्वारे गोळा होणारा निधी शेतकºयांच्या मदतीसाठी दिला जाईल, अशी घोषणा जनमंचने केली होती. त्यानुसार ७ जानेवारी २०१८ रोजी प्रस्तावित शेतकरी मेळाव्यात या निधीचे वाटप केले जाईल, असे या कार्यक्रमात जाहीर करण्यात आले.