मानवासाठी आवश्यक मुलभूत अन्नतत्वे मोठ्याप्रमाणात उत्पादित करणाऱ्या नवीन वाणांचा विकास करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात राज्यातील पहिला राईस पार्क सुरू करण्यात येईल. ...
केंद्र आणि राज्याच्या योजना शेवटच्या लोकांपर्यंत पोहचवून गावाचा विकास करणारा सरपंच हा दुवा असलेल्या व गावातील शेवटच्या व्यक्तीसाठी काम करून गावाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या सरपंचाना लोकमतने नागपुरात एका दिमाखदार सोहळ्यात हृद्य गौरवान्वित केले. ...
शहरातील ‘कुख्यात गुन्हेगारांसोबत स्रेहबंध’ असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यामुळे आरोपी सेल मध्ये कार्यरत असलेल्या ८ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले. या कारवाईमुळे शहर पोलीस दलात भूकंपासारखे वातावरण निर्माण झाले आहे. ...
आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त ज्वेलरी डिझायनर नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) ११३०० कोटींचा गंडा घातल्याचे काल उघडकीस आल्यानंतर आता प्रवर्तन निदेशालय (एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट) सध्या या प्रकरणाची चौकशी करीत आहे. ...
मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे (मसाप) देण्यात येणारा कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार ज्येष्ठ कवी डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषादिनी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. ...
कराचा (जीएसटी) भुर्दंड चुकविण्यासाठी एका व्यक्तीला दीड लाखांची लाच मागणारे अमरावती येथील केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे (नवीन केंद्रीय जीएसटी कार्यालय) उपायुक्त मुकुल विश्वास तेलगोटे यांना गुरुवारी रंगेहात पकडण्यात आले. ...
बेदरकारणपणे वाहन चालवून अपघात घडवून आणणाऱ्यांना आवरण्यासाठी स्पीडगनचा वापर करण्यात येईल. शहराला अपघातमुक्त शहर बनविण्याचे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त एस. चैतन्य यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
गेल्या २२ वर्षापासून अतिक्रमण हटावे यासाठी संघर्ष करीत आहे. सुरुवातीला मुले लहान होती. आता मोठी झाली आहे. न्यायासाठी भटकंती करून थकलो आहे. परंतु न्याय मिळेल अशी आशा आहे. महापालिकेत गरिबाला न्याय मिळत नाही. अशी व्यथा मन्सूर इब्राहीम यांनी मांडली. ...
नागपूर रेल्वेस्थानकावर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांच्या संकल्पनेतून बुलंद आर्ट गॅलरी साकारण्यात आली असून ही गॅलरी प्रवाशांना पाहण्यासाठी नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...