रामटेक येथील ७० वर्षीय मोतीराम येसनसुरे यांच्या डाव्या हाताला बोटं नाहीत. त्यामुळे त्यांना आधार कार्ड मिळाले नाही. परिणामी, बँक अधिकाऱ्यांनी त्यांचे बँक खाते बंद केले. त्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...
सध्या गहू भरण्याचा काळ असून, पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. मौदा तालुक्यात सिंचनाची प्रभावी साधने नसल्याने पाण्याअभावी गव्हाचे पीक सध्या सुकण्याच्या मार्गावर आहे. ...
अर्धवट अवस्थेतील सिंचनाची कामे करताना पारदर्शकता पाळा, कामाची गुणवत्ता कायम ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे वेळेत काम पूर्ण करा, असे निर्देश केंद्रीय रस्ते व परिवहन, जहाजबांधणी, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. ...
४८ टक्के ९ ते ११ वयोगटातील मुलींमध्ये तर ७६ टक्केगर्भवती महिलांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती भारतीय बालरोग संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग यांनी दिली. ...
ऐतिहासिक व पौराणिक महात्म्य असलेले रामटेक बसस्थानक सध्या विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. प्रवाशांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा नियमित सामना करावा लागत आहे. ...
नागपूर - अमरावती महामार्गावर असलेल्या सातनवरी शिवरातील इंड्स पेपर मिलला रविवारी दुपारी २.१५ च्या सुमारास आग लागली. त्यात कंपनीच्या आवारात ठेवण्यात आलेला कोट्यवधी रुपये किमतीचा आयातीत माल जळून राख झाला. ...