बहुप्रतीक्षेत व राज्य शासनाचा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ असलेल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक म्हणून मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी पदभार सांभाळताच केवळ तीन महिन्यांमध्ये विकास कामांना गती आली आहे. ...
रुग्णाच्या हितासाठी मेंदूच्या उपचारात समान मानक आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मत प्रसिद्ध ‘न्यूरो सर्जन’ व ‘सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स’चे (सिम्स) संचालक डॉ. लोकेंद्र सिंह यांनी व्यक्त केले. ...
ग्लोबल वॉर्मिंग, वातावरण बदल या समस्या येत्या ३० वर्षात गंभीर रूप धारण करणार आहेत. मात्र अजून ३० वर्षे वेळ आहे असा विचार करून दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील. ...
शेंगदाणा तेलाच्या शुद्धतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या तेलात कोणती भेसळ करण्यात येते हे प्रशासनाने शोधून काढावे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत नागपूर जिल्हातर्फे करण्यात आली आहे. ...
डेबिट कार्डचे क्लोनिंग करून अज्ञात आरोपीने एका व्यापाऱ्याच्या खात्यातून ४० हजार रुपये काढून घेतले. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या खळबळजनक घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. ...
डेबिट, क्रेडिट कार्ड रिन्यूव्हल करण्याच्या नावाखाली कार्ड तसेच बँक खात्याची माहिती घेऊन अनेकांच्या बँक खात्यातून लाखोंची रक्कम लंपास करणाऱ्या झारखंडमधील ठगजबाजाचा शोध लावण्यात अंबाझरी पोलिसांनी यश मिळवले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात महाविद्यालयांची संख्या भरमसाठ असली तरी ‘प्लेसमेन्ट’सोबतच उद्योगजगताशी ‘लिंकेज’चे प्रमाण मात्र कमी आहे. यामुळे विद्यार्थी ‘आयआयटी’, ‘एनआयटी’ किंवा इतर मोठ्या शहरांकडे शिक्षणासाठी वळत आहेत. ...
शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणातून आपला उत्कर्ष साधावा. त्यासाठी राज्य अल्पसंख्याक आयोग विद्यार्थ्यांच्या भक्कमपणे पाठीशी उभे असल्याचे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आराफत शेख यांनी सांगितले. ...
पूर्वी आर्थिक डबघाईस आलेल्या महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा आणि बुलडाणा जिल्हा सहकारी बँका शासन ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. शासनाने प्रक्रिया सुरू केली असून, तिन्ही बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलीन होणार असल्याची माहिती आहे. ...
अयोध्येत राममंदिर बनावे यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. देशभरात ‘हुंकार’ सभा घेतल्यानंतर आता राममंदिरासाठी ‘संकल्प अनुष्ठान’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ...