पाचवे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश किरण देशपांडे यांना मारहाण करणारे सहायक सरकारी वकील अॅड. दीपेश मदनलाल पराते यांना सत्र न्यायालयाने शुक्रवारी सशर्त जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.जी. रघुवंशी यांनी हा निर्णय दिला. ...
वेगाने पूर्ण होणाऱ्या नागपूर मेट्रो प्रकल्पामुळे नागपूर शहराची नवी ओळख निर्माण झाली आहे. नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे कार्य पूर्ण होताच मला मेट्रोत बसायला आवडेल, अशी इच्छा ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीर केली. ...
अत्याचार झाला त्यावेळी पीडित मुलगी अल्पवयीन होती हे सरकार पक्षाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सिद्ध करता आले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने आरोपीला संशयाचा लाभ देऊन निर्दोष सोडण्याचा आदेश दिला. हे प्रकरण अमरावती जिल्ह्यातील आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) कणा असलेल्या निवासी डॉक्टरांना गेल्या दोन महिन्यांपासून विद्यावेतन मिळाले नाही. या विरोधात सोमवारपासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. बुधवारी ‘थाळी बजाओ’ आंदोलन करून मेडिकलचा परिसर दणाणून सोडला. ...
प्लास्टिकच्या समस्येसह जलप्रदुषण व वायुप्रदुषणाची गंभीर समस्या देशात आहे. त्यावर केंद्र आणि विविध राज्यातील शासनाद्वारे राबविणाऱ्या योजनांवर कोट्यवधीचा खर्च केला जातो. मात्र हा मोठा आजार झाल्यानंतर उपचार करण्यासारखा प्रकार असून त्याने समस्या सुटण्याच ...
जरीपटक्यातील मायलेकींनी एका तरुणीवर चोरी तसेच संवेदनशील आरोप लावून तिला भररस्त्यावर बेदम मारहाण केली. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला. ...
घरभेद्यांच्या कपट कारस्थानाचा उपयोग करून औरंगजेब बादशाह शंभुराजेंना पकडतो. पुढे सुटकेसाठी औरंगजेब त्यांच्यासमोर स्वराज्याचे गडकिल्ले देण्याची व धर्मपरिवर्तनाची अट घालत पुढील ४० दिवस प्रचंड यातना देतो. अगदी कानात शिसे ओतण्यापासून डोळे फोडणे व जीभ कापण ...
मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी सकाळी धंतोली पोलिसांनी धंतोलीतील मद्यसम्राटाकडे केलेल्या कारवाईनंतर बनावट दारू तयार करणा-या मद्यमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई कशी दडपता येईल, यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले असून, त्यामुळे आज दिवसभर मद्यमाफियां ...
पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले- तेली यांची नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतिपदी बदली करण्यात आली आहे. या शिवाय, उगले यांच्याकडे सदस्य सचिव वैधानिक विकास महामंडळ या पदाचा अतिरिक्त पदभारही असणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव ...