आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील जिल्हा परिषद शिक्षकांकडील अतिरिक्त वेतन वसुलीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली. तसेच, राज्य सरकार व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून वसुलीविरुद्धच्या आक्षेपांवर उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. ...
रेती तस्करांच्या मुजोरीची व कायद्याचा धाक न बाळगण्याच्या वृत्तीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यामुळे रेती तस्करांवर वचक बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ...
दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी दुपारी २.२० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वरून अटक केली. अटक केलेल्या महिलांकडून दारुच्या १८८५० रुपये किमतीच्या २९० बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत. ...
अपघातात गंभीर जखमी होऊन ‘ब्रेन डेड’ झालेल्या यवतमाळ येथील ५२ वर्षीय व्यक्तीचे शुक्रवारी नागपुरात अवयव दान करण्यात आले. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याच्या दु:खातही पत्नी आणि नातेवाईकांनी मानवतावादी भूमिका घेत अवयवदानाचा निर्णय घेतला. यामुळे तीन रुग्णां ...
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १९ लाख ८० हजाराचे ११ पेसमेकर तर ११ लाख ९० हजाराचे पोर्टेबल व्हेंटिलेटर येऊन एक महिना झाला आहे. परंतु हे यंत्र डब्यातच बंद आहे. धक्कादायक म्हणजे, या यंत्राचा निधी मेडिकलच्या खात्यात जमा न होताच पुरवठादाराने यंत्र पाठविली ...
शहरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. यातच दूषित पाण्यामुळे होणारे आजार वाढले आहेत. गेल्या महिन्यात गॅस्ट्रोचा ३९६ रुग्णांची नोंद झाली आहे. पाणी समस्येसोबतच वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या उष्माघाताचे रुग्णही वाढले आहेत. एप्रिल महिन्यात १९२ रुग ...
सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय (एसईबीसी) प्रवर्गात मोडणाऱ्या मराठा व इतर विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांतील सर्व प्रवेश रद्द झाल्याचे स्पष्टीकरण देण्याची राज्य सीईटी सेलची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी फे ...
साधारणत: माहिती अधिकारांतर्गत नेमकी, ठोस व मुद्देसूद आकडेवारी मिळणे अपेक्षित आहे. मात्र नागपूर पोलिसांनी ‘सायबर क्राईम’अंतर्गत एकाच वर्षात दाखल गुन्ह्यांची दोन माहिती अधिकारात वेगवेगळी माहिती देण्याचा प्रताप केला आहे. ...
अवैध सावकारी करणाऱ्या आरोपीने त्याच्या दोन मित्रांसह स्वप्निल प्रदीप मेश्राम (वय २४) नामक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचे अपहरण केले. त्याला बेदम मारहाण करून त्याच्या वडिलांना तीन लाखाच्या खंडणीची मागणी केली. प्रसंगावधान राखत स्वप्निलच्या वडिलांनी लग ...
बुधवारी सायंकाळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एका ३० किलो वजनाच्या आणि सहा महिन्याच्या मादा बछड्यास रॅपिड रिस्पॉन्स युनिट(आरआरटी)ने ब्रह्मपुरी वन प्रभागात यशस्वीरीत्या बेशुद्ध करून ताब्यात घेतले. सहा महिन्याच्या मादा बछड्याला बेशुद्ध करण्यासाठी ...