व्हीव्हीपॅटच्या मतांची मोजणी करण्यात येणार असल्यामुळे यावेळी मतमोजणीला खूप वेळ लागेल. रात्री ११ नंतरच अंतिम निकालाची घोषणा होऊ शकेल, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले. ...
लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही तासांवर आले असताना राजकीय पक्षांमधील धाकधूक वाढली आहे. ‘एक्झिट पोल्स’नंतर काही भाजपा-सेनेच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह इतर पक्षांकडून या आकड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. ...
नागपूर शहराला नवेगाव खैरी प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येत असून, तोतलाडोह या प्रकल्पाच्या मृत पाणीसाठ्यातूनही पाणीपुरवठा करण्याला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पात १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा मृत जलसाठा उपलब्ध आहे. ...
विश्व संवाद केंद्र, नागपूरतर्फे देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद जयंती पत्रकारिता सन्मान पुरस्कार २०१९ ची घोषणा करण्यात आली आहे. ‘लोकमत’चे समन्वय संपादक कमलाकर धारप तसेच ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ पोफळी यांचा जीवनव्रती पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. ...
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था दिल्लीमार्फत नागपूर महापालिकेमध्ये सुरू असलेल्या इक्वीसिटी प्रकल्पांतर्गत मनपातील वर्ग १ व वर्ग २च्या अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. ...
रेल्वेच्या विविध विभागात सुरू असलेल्या विकासकामांमुळे सोमवारी ११ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत होत्या. यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. ...
लोकहिताचा विचार न करता लोकरंजनाची धोरणे राबविण्याची प्रवृत्ती जगभरात झपाट्याने वाढत आहे. हा लोकरंजनवाद लोकशाही व संविधानिक मूल्यांसाठी धोकादायक सिद्ध होत आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे नागपूरकर न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी व्यक्त केले. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी बालरंगभूमीच्या नागपूर शाखेच्या अध्यक्षपदी मधुरा सारंग गडकरी यांची निवड करण्यात आली आहे. ...
ईव्हीएमवरील मतमोजणी झाल्यानंतर व्हीव्हीपॅटमधील मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात येईल. ...