लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना उठाबशा काढायला लावणे, ‘मी देश, समाज व कुटुंबाचा शत्रू आहे’ असे लिहिलेला फलक हातात देऊन फोटो काढणे अशाप्रकारच्या मानहानीजनक कारवाया करणे शहर पोलिसांना महागात पडले. ...
सतरंजीपुरा व मोमिनपुरानंतर हॉटस्पॉट ठरू पाहणाऱ्या रामेश्वरी रोड पार्वतीनगरातील १०६ संशयितांचे नमुने निगेटिव्ह आले. यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु या वसाहतीसह आजूबाजूच्या वसाहती सील केल्याने व २३० वर नागरिकांना क्वारंटाईन करण्या ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीत जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात अद्याप रुग्ण नाही. मात्र भविष्यात विदारक स्थिती निर्माण झाल्यास उपाययोजना म्हणून स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने युनिसेफच्या सहका ...
शुक्रवारी ३ रेल्वेगाड्या नागपूर रेल्वेस्थानकावर दाखल झाल्या. या गाड्यांमधील ३६०० कामगारांच्या भोजनाची व्यवस्था इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात आली. ...
उद्योग संचालनालयाचे महाव्यवस्थापक जी.ओ. भारती यांनी नागपूर महानगरपालिकेच्या सीमेबाहेर ग्रामीण भागात उद्योग सुरू करण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार परवानगी घेऊन उद्योजकांनी कारखाने सुरू करावेत, असे आवाहन विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे (व्हीआयए) अ ...
कोरोना प्रादुर्भावामुळे केवळ अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्याच परीक्षा घेण्याचा निर्णय राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. परंतु या निर्णयामुळे विद्यापीठांची धावपळ होणार आहे. परीक्षेची प्रणाली बदलणार असल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ना ...
राज्यातील इतर जिल्ह्यात तसेच बाहेरच्या राज्यात प्रवासाच्या परवानगीसाठीच्या वाहतूक परवान्यांचे वाटप सुरू झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नागपूर जिल्ह्यातील २ हजार १४९ नागरिकांना वाहतूक परवाने देण्यात आले. ...
कोविड-१९ च्या दृष्टीने नागपूर शहरासाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या कालावधीत आपले नियंत्रण राहिले नाही तर पुढील १५ महिने असेच राहावे लागेल. त्यामुळे पोलिसांनो, प्रतिबंधित क्षेत्रामधील कुठलीही व्यक्ती बाहेर येणार नाही, असा बंदोबस्त करा आणि ...