ज्या कोरोनाबाधित रुग्णांना सातव्या, आठव्या व नवव्या दिवशी ताप नसल्यास, त्या रुग्णांना दहाव्या दिवशी कोरोनाची चाचणी न करता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याच्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार मेडिकलने २१ रुग्णांना तर १४ दिवसानंतर नमुने निगेटिव्ह आलेल्या सात ...
दुचाकीवर गावठी दारूची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला तहसील पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. त्याच्याकडून पावणे दोनशे लिटर गावठी दारू तसेच अॅक्टिव्हा जप्त करण्यात आली. ...
महावितरणकडून वीज ग्राहकांना मोबाईल एसएसएस सुविधा नि:शुल्क उपलब्ध करून दिल्याने नागपूर जिल्ह्यातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहक याचा लाभ घेत आहेत. जिल्ह्यातील सुमारे २ लाख वीज ग्राहकांनी अद्यापही महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी न केल्याने ते ...
सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री एका कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला, हे वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते. ...
कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे अशा रुग्णांच्या सध्या उपचारासाठी असलेल्या सुविधांमध्ये वाढ करून अतिदक्षता कक्ष, प्रत्येक बेडवर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी सुविधा या उपचारासाठी अत्यंत आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्यंत प्रतिकू ...
कोरोना संक्रमण वाढू नये याकरिता जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शिकेचे जिल्हा व सत्र न्यायालय इमारत आणि परिसरात सक्तीने पालन करणे बंधनकारक आहे. या मार्गदर्शिकेचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दे ...
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांच्या मृत्यूचे प्रमाण वाढवले आहे. नागपुरात गेल्या दीड महिन्यात दीडशेपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांचा मृत्यू झाला आहे. ...
लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यात महापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या मालमत्ता करवसुली, नगररचना विभागाकडून होणारी शुल्क वसुली व पाणीपट्टी वसुलीवर परिणाम झाला आहे. त्यातच राज्य सरकारने एप्रिल महिन्याच्या जीएसटी अनुदानात ४७ टक्के कपात केली आहे. ...
शुक्रवारपासून जिल्ह्यात दारू विक्रीस सुरुवात होत आहे, तसे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज गुरुवारी जारी केले आहेत. नगर परिषद, नगरपंचायत भागात टोकन व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने विक्री होणार असून शहरी भागात फक्त ऑनलाईनच विक्री होईल. कंटेन्मेंट ...
नागपूर महापालिकेने लॉकडाऊनमधून काही व्यवसायांना शिथिलता दिली आहे. महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार गुरुवारी ऑटो स्पेअर पार्ट अॅण्ड रिपेअर शॉप, ऑईल आणि ल्युब्रिके न्ट शॉप, ऑप्टिकल, स्टेशनरी, होजियरी शॉप सुरू काही भागात सुरू झाले. ...