केमिकल फॅक्टरीचे लायसन्स मिळवून देण्याची थाप मारून एका कथित नेत्याने एका दाम्पत्याचे १० लाख रुपये हडपले. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे. उमेश मारोतराव पिंपळे असे आरोपीचे नाव असून तो गोकुळपेठ मार्केट जवळ राहतो. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकून पडलेला ७७ कोटी रुपयांच्या निधीवरून आता राजकारण तापले आहे. विरोधकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. विरोधकांच्या मागणीला उत्तर देताना जि.प.च्या सत्ताधाऱ्यांनी ७ वर्षे सत्तेत असताना झोपले होत ...
आयुक्त स्थायी समितीच्या बैठकीला आधी परवानगी नाकारतात, नंतर तेच परवानगी देतात. निगम सचिवांनी आयुक्तांशी चर्चा केल्यानतंरच २०जूनच्या सर्वसाधारण सभेचा अजेंडा काढला. त्यानंतर सोमवारी प्रशासनाकडून महापौर कार्यालयाला पत्र पाठवून कोरोना संसर्गाचा विचार करता ...
चोरी, घरफोडीच्या प्रयत्नात पहाटेच्या वेळी फिरणाऱ्या गुन्हेगारांमध्ये वाद होऊन तिघांनी एकावर चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मिळणाऱ्या ४ टक्के सादिल अनुदानापासून नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळा वंचित आहेत. प्रशासनाच्या चुकीमुळे शासनाने जि.प.चे हे अनुदान नऊ वर्षांपासून गोठविले आहे. ...
दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा बोर्डाकडून अद्याप जाहीर झालेल्या नाही. असे असतानाही समाजमाध्यमांवरून या निकालाच्या तारखा जाहीर होत असल्याने पालक आणि विद्यार्थी बुचकळ्यात पडले आहेत. मात्र अद्याप कोणत्याही तारखा जाहीर केल्या नसल्याचे बोर्डाने एक ...
पर्यावरण संवर्धनासाठी शासनाकडून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा प्रचार केला जातो. दुसरीकडे अजनी परिसरातील फूड कॉर्पोशन आॅफ इंडिया(एफसीआय)च्या गोदाम परिसरातील २७ झाडांची सोमवारी कत्तल करण्यात आली. परिसरातील सतर्क नागरिकांनी यासंदर्भात महापालिकेच्या उद्यान ...
नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या कामठी मार्गावरील उड्डाणपुलाचे निर्माण कार्य सुरू असून हा मार्ग आता डबलडेकर उड्डाणपुलाचा आकार घेत आहे. ...
रविवारच्या पावसात बाजेरिया मारवाडी चाळ नाल्याची सुमारे १५० मीटर लांबीची भिंत कोसळली. यामुळे रस्ता खचण्याचा धोका आहे, तसेच आजूबाजूच्या घरांनाही धोका निर्माण झाला आहे. बाजूला असलेला हायटेंशन लाईनचा पोल कोसळण्याची शक्यता आहे. ...