ताजाबाद येथील कुख्यात गुंड राजा खान ऊर्फ क्रॅक याने खंडणी वसुलीसाठी उमरेड रोडवरील फूटपाथ दुकानदारांमध्ये दहशत पसरवली आहे. एका दुकानदाराच्या घरात घुसून त्याला व त्याच्या आईला मारहाण केली. नंदनवन पोलिसांनी राजाला अटक करून त्याच्याजवळून पिस्तूल जप्त केल ...
महापालिकेच्या मंगळवारी झोनमधील प्रभाग क्रमांक ११ मधील शबरी माता नगर, गोरेवाडा या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये, या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश ...
पाच महिन्याचा चिमुकला व एसआरपीएफच्या सहा जवानासह १३ रुग्ण बुधवारी पॉझिटिव्ह आले. नागपुरात पहिल्यांदाच कमी वयाच्या रुग्णाची नोंद झाली. आईवडिलांचे नमुने निगेटिव्ह तर चिमुकल्याचा नमुना पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, नागपूर ग्रामीणमध्ये कन्हान, कामठीसोबतच ...
विदर्भातील वातावरणावर अद्याप ‘अम्फान’चा परिणाम पडल्याची कोणतीही चिन्हे नाहीत. याचदरम्यान बुधवारी वातावरण कोरडे असल्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील तापमान वाढलेले होते. बुधवारी नागपूरचे तापमान ४४.२ अंश होते. तर अकोलाचे तापमान विदर्भातून सर्वात जास्त ...
हुडकेश्वरमधील नरसाळा परिसरात गँगवॉर भडकले. मंगळवारी रात्री दोन्ही गटांनी एकमेकांवर शस्त्रांनी हल्ला केला. लॉकडाऊनदरम्यान तीन तास चाललेल्या या मारहाणीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. ...
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून आता शिथिलता मिळायला लागली आहे. दुकाने, उद्योगधंदे, कार्यालये आता सुरू व्हायला लागली असून नागरिकांची ये-जा वाढली आहे. हा दिलासा मिळताना ऑटोचालक हा वर्ग दुर्लक्षित राहिला आहे. ५५ दिवसांपासून बेरोजगार अ ...
लॉकडाऊनमध्ये दारू विक्रीच्या प्रकरणात अडकलेले दोन आरोपी नगरसेवकाचे कार्यकर्ते असल्याचे कळल्यामुळे लकडगंज ठाण्याच्या परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी दोन्ही बाईकस्वार युवकांना अटक केली आहे. त्यांनी ही दारू एका नगरसेवकाच्या सांगण्यावरून ठेवल्याची माहिती आ ...
सर्व अडतिये आणि व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी आणि शेतकऱ्यांचा माल मार्केटच्या आत नेण्याच्या परवानगीसह मार्केट पूर्ववत सुरू करण्याची मागणी महात्मा फुले अडतिया असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी मनपाचे अधिकारी महेश मोरोणे यांच्याकडे केली. बुधवा ...
क्रेडिट कार्ड अॅक्टिव्हेट करण्याच्या बहाण्याने शहर पोलीस ठाण्यातील शिपायालाच सायबर ठगबाजांनी ५० हजार रुपयांनी गंडविले. ही घटना गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडली. ...
वन्यजीवांच्या यादीमध्ये दुर्मिळ असलेल्या खवल्या मांजर या प्राण्याची शिकार केल्याची घटना पेंच व्याघ्र प्रकल्पात घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून शिजविण्यास घातलेला हा प्राणीही जप्त करण्यात आला आहे. ...