नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या गँगस्टर संतोष आंबेकर आणि एकाच दिवशी पाच ठिकाणी फायरिंग करून पाच वर्षांपूर्वी नागपुरात खळबळ उडवून देणारा कुख्यात गुंड राजा गौस या दोघांना कोरोनाने जखडले आहे. कारागृहातील इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ...
मेडिकलमध्ये कोविड पॉझिटिव्ह म्हणून उपचार घेत असलेली एक महिला व दुसरा एक पुरुष रुग्ण पळून गेल्याच्या घटनेने खळबळ उडाली. विशेष म्हणजे, महिला रुग्ण परत आली; परंतु दोन दिवस होऊनही पुरुष रुग्णाचा अद्यापही शोध सुरू आहे. ...
कोविड पॉझिटिव्ह रुग्णसंख्या नवनवीन उच्चांक गाठत असताना मंगळवारी पहिल्यांदाच एकाच घरातून दोन कोविड रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. चार दिवसापूर्वी मुलाचा तर आज त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. मृतांची एकूण संख्या ३८ झाली. ...
महापौर संदीप जोशी तसेच नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचे षड्यंत्र रचणारी ‘ऑडिओ क्लिप’ व्हायरल झाली आहे. या ‘क्लिप’मुळे खळबळ उडाली असून यामागे कुणाचे षड्यंत्र आहे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज दुपारी डांबरगिट्टीचा मिश्रण असलेला ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघात ट्रक चालकाचा मृत्यू झाला. तत्पूर्वी अनियंत्रित ट्रकने परिसरातील एका घराच्या भिंतीला धडक दिली आणि तीन वाहनांचीही मोडतोड केली. या अपघातामुळे परिसरात ...
कचऱ्याच्या गाडीत माती भरून भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये टाकत असल्याप्रकरणी मनपाने कारवाईची तयारी सुरू केली आहे. या प्रकरणात कचरा संकलन करणाऱ्या ‘एजी एन्व्हायरो’ कंपनीच्या महिन्याच्या बिलातून १० टक्के रक्कम दंडाच्या रूपात कपात करण्यात येईल. अप्पर आयुक ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरु नियुक्तीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा अखेर सुरू झाला आहे. निवड समितीकडे या पदासाठी जवळपास १२५ अर्ज आले असून त्यांची छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना जुलै महिन्यातच सादरीकरणाची संधी ...
चीनमधून कोरोनाचा जगभर फैलाव आणि लष्कराच्या कुरापतींमुळे भारतीय चिनी वस्तू खरेदीला नकार देत आहेत. मोबाईल, लॅपटॉप असो वा इतर कोणत्याही वस्तू चिनी नकोच, भारतीय अथवा इतर देशांच्या असल्या तरी त्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. ...
एखाद्या कारखान्यात कोरोना रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या कामगारांना तब्बल २८ दिवस क्वारंटाईन करण्यात येते. त्यामुळे कामगार कामावर येत नसल्याने कारखाना तब्बल एक महिना बंद राहतो. कारखाने सुरू ठेवा आणि संपर्कातील कामगारांना २८ दिवस क्वारंटाईन ...