भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) आयएसआय मार्कचा उपयोग करणाऱ्या एका पीव्हीसी पाईप उत्पादकावर कारवाई केली. उत्पादकाकडे बीआयएसचे प्रमाणपत्र नव्हते, हे विशेष. ...
लाडक्या श्री गणरायाला निरोप देण्याचा दिवस जवळ येऊ लागल्याने पोलिसांनीही विसर्जन बंदोबस्ताची तयारी केली आहे. विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन कंपन्या आणि ५७५ होमगार्डस्सह अडीच हजार पोलीस बंदोबस्तात तैनात राहणार आहेत. ...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरात प्रत्येक शनिवार व रविवारी कर्फ्यूसह लॉकडाऊन लागू होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. परंतु विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी मात्र असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात गठित समितीची नियमित बैठ ...
कोविड-१९ रुग्णांची संख्या वाढत असल्याने मनपाच्या केंद्रांवर चाचणीसाठी लोकांची गर्दी होत आहे. यामुळे केंद्रावर ताण वाढत आहे. सध्या ३४ केंद्रावर चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. चाचणीसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी व्हावी, यासाठी चाचणी केंद्रांची संख ...
सलग चार दिवसांपासून रुग्णसंख्या हजारावर गेली असताना शनिवारी काहिशी घट आली. विशेष म्हणजे, ९२१ नव्या रुग्णांची भर पडली असताना त्यापेक्षा अधिक, १११२ रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य यंत्रणेसाठी ही समाधानकारक बाब आहे. मात्र, मृत्यूचे सत्र सुरूच आहे. ३३ रुग्णा ...
आपल्याला कोरोनाची लक्षणे नसतानाही त्याची चाचणी पॉझिटीव्ह आली व आपण गृह विलगीकरणात आहोत, सर्वांनी आपली काळजी घ्यावी, अशा आशयाची एक पोस्ट मनपाचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी संध्याकाळी फेसबुकवर टाकली आहे. ...
केंद्रीय प्रवेश समितीतर्फे घेण्यात येत असलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी रविवार, ३० ऑगस्ट रोजी प्रकाशित होणार आहे. दुपारी ३ वाजता समितीच्या वेबसाईटवर बघायला मिळणार आहे. ३१ ऑगस्टपासून ते ३ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉले ...
कोरोनामुळे सर्वात जास्त फटका शिक्षणाला बसला आहे. मार्च महिन्यापासून बंद पडलेल्या शाळा अजूनही सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे शासनाने ऑनलाईनचा पर्याय आणला. परंतु ऑनलाईन शिक्षणापासून जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी दूरच आहेत. ...