पत्नीने दारू पिण्यास हटकल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो रोज दारू पिऊन येत असल्याने पत्नी त्याला हटकत होती. त्यावरून दोघांत नेहमीच खटके उडायचे. ...
नियमानुसार झाडाला पाणी शोषून घेता येईल एवढी जागा साेडणे गरजेचे आहे. त्यासाठी एक ते दीड मीटर जागा साेडावी आणि बुंध्याभाेवती कठडे बनविणे गरजेचे आहे. मात्र बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडून नियमांची ऐसीतैशी केली जात असल्याचे कुळकर्णी यांनी सांगितले. ...
गुरुवारी रात्री पोलिसांनी कळमण्यातील जे. बी. गृह उद्योग नामक गोदामावर छापा घातला. पवनगाव मार्गावर असलेल्या या गोदामाजवळ सुपारीने भरलेला ट्रक सापडला. या ट्रकमध्ये तसेच गोदामात पोलिसांना एकूण १८० पोती सुपारी आढळली. ...
विकास कामासाठी प्राप्त झालेला संपूर्ण निधी खर्च करण्याची जबाबदारी विभाग प्रमुखांची आहे. ३१ मार्चपूर्वी मंजूर निधी खर्च होईल त्या दृष्टीने नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिल्या. ...
उदालत हा मंगळवारी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास काही काम असल्याचे सांगत घराबाहेर पडला. त्यानंतर तो परतलाच नाही. दोन दिवसानंतर शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. ...
नवीन वर्षात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती केली जाईल. त्याचप्रमाणे नवीन वर्षांत उपराजधानीत महिला पोलीस स्टेशन निर्माण करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ...
Nagpur News एकमेकींवर नितांत प्रेम करीत असलेल्या दोन तरुणींनी सोबत राहण्याचा निर्धार करीत, कमिटमेंट रिंग सेरेमनी, म्हणजे एक प्रकारच्या साक्षगंध सोहळ्यात परस्परांना अंगठ्या घालीत आपल्या सहवाटचालीवर शिक्कामोर्तब केले. ...
Samruddhi highway : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यांतील काही मोठ्या पुलांचे काम येत्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करता येणार नाही. ...
Nagpur News नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्या आणि अन्य कार्यक्रमांवर निर्बंध घातल्यामुळे, नागपूर जिल्ह्यात आज, ३१ डिसेंबरला एकाच दिवशी १०० कोटींचे नुकसान होणार असल्याची माहिती आहे. ...