शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
2
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
3
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
4
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
5
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
6
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
7
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
8
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
9
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
10
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
11
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
12
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
13
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
14
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
15
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
16
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
17
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
18
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
19
IND vs SA 2nd Test Day 3 Stumps : बावुमानं टीम इंडियाला फॉलोऑन देणं टाळलं; कारण...
20
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

‘पढेंगा इंडिया, बढेंगा इंडिया’साठी तो धावला ३३३ किलोमीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 20:56 IST

समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण आवश्यक आहे. शाळेत मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याने शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हा उद्देश घेऊन ‘पढेंगा इंडिया, बढेंगा इंडिया’ या संदेशाला गावखेड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी एक युवक हाती तिरंगा ध्वज घेऊन तब्बल ३३३ किलोमीटर धावला.

ठळक मुद्देअतुल चौकसेची कामगिरी : ८० वर शाळांना दिली भेट, विद्यार्थ्यांशी साधला संवाद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण आवश्यक आहे. शाळेत मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याने शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हा उद्देश घेऊन ‘पढेंगा इंडिया, बढेंगा इंडिया’ या संदेशाला गावखेड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी एक युवक हाती तिरंगा ध्वज घेऊन तब्बल ३३३ किलोमीटर धावला. 

यादरम्यान त्याने ७० पेक्षा जास्त गावे व ८० वर शाळांना भेटी देत शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.अतुलकुमार चौकसे त्या तरुण धावपटूचे नाव. समाजासाठी आपले काही देणे लागते, या आयुष्यात देशासाठी काही महत्त्वपूर्ण कामगिरी करावी, या विचाराने अतुल झपाटलेला आहे. नुकतेच त्याने दक्षिण आफिक्रेच्या सहारा वाळवंटात, ५० अंशावर तापमानात, सलग सात दिवस २५० किलोमीटरची सर्वात कठीण मॅरेथॉनमध्येभारताचे प्रतिनिधित्व केले. कच्छच्या वाळवंटातही त्याने १६१ किलोमीटर तर १८ हजार फूट उंच असलेल्या हिमालयाचा दऱ्याखोऱ्यात ११४ किलोमीटरचे अंतर त्याने धावत कापले. आपल्या या धावण्याचा समाजोपयोगही व्हावा, या उद्देशाने ‘पढेंगा इंडिया, बढेंगा इंडिया’ हा संदेश गावखेड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. नागपूर ते पचमढी हे ३३३ किलोमीटर अंतराचे लक्ष्य ठेवले. यात त्याचा भाऊ आशिषकुमार चौकसे मदतीसाठी आला. १४ जुलै रोजी नागपूरच्या रामगिरीवरून अतुलने धावण्यास सुरुवात केली. यावेळी त्याच्यासोबतच विविध सामाजिक संस्था व क्रीडा संस्थेचे प्रतिनिधी नागपूरच्या सीमारेषपर्यंत धावले. अतुलने सहा दिवसांत ३३३ किलोमीटर अंतर कापले. यादरम्यान तीन जिल्हे, १५ तहसील, ७० पेक्षा जास्त गावे व ८० वर शाळांना भेटी दिल्या. तेथील प्राचार्य, मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थ्यांना भेटून एकही मुलगा-मुलगी शिक्षणापासूच वंचित राहणार नाही, अर्धवट शिक्षण सोडून जाणाऱ्यांसाठी उपाययोजना करण्यासंदर्भातही त्याने संवाद साधला. २२ जुलै रोजी अतुल पचमढी येथे पोहचला. यावेळी डेप्युटी कमांडिंग ऑफिसर कर्नल विजय तोमर यांनी त्याचे स्वागत केले. २१ जुलै रोजी पचमढी येथे आयोजित २१ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेतही तो सहभागी झाला.‘लोकमत’शी बोलताना अतुल म्हणाला, कुटुंबातील दारिद्र्य, वस्तीतील गुन्हेगारी प्रवृत्ती, अज्ञान, अत्यंत निकृष्ट व प्रतिकूल वातावरण आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव या सर्वांचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतो. परिणामत: या भागात राहणारी मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे आढळून आले. भाविष्यात इंटरनॅशनल चॅलेंजेस्मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनIndiaभारतEducationशिक्षण