शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीत मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
2
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
3
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
4
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
5
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
6
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
8
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
9
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
10
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
11
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
12
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
13
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
14
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
15
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
16
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
17
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
18
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
19
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
20
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO

धान खरेदी थांबली, ५५० कोटींचे चुकारेही रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 00:45 IST

गाेदामे फुल्ल; भरडाई अजूनही वेग घेईना

सुनील चरपे

नागपूर : पणन महासंघ आणि आदिवासी विकास महामंडळाच्या ४२३ धान खरेदी केंद्रांवर नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीप्रमाणे सुमारे ५८ लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. ऑक्टाेबर २०२०च्या शेवटच्या आठवड्यात सुरू करण्यात आलेली खरेदी फेब्रुवारी २०२१ मध्ये गोदामे हाऊसफुल्ल झाल्याने बंद करण्यात आली. हंगाम संपत आला असला तरी या दाेन्ही शासकीय संस्थांनी धान भरडाई (मिलिंग) अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू केली नाही. त्यामुळे हजारो क्विंटल धान उघड्यावर पडून आहे.

पूर्व विदर्भात ४२३ खरेदी केंद्रांपैकी पणन महासंघाची २४१, तर आदिवासी विकास महामंडळाची १८२ खरेदी केंद्रे आहेत. सर्वाधिक २६ लाख क्विंटल खरेदी भंडारा जिल्ह्यात करण्यात आली. या खरेदीचा वेगही सुरुवातीपासून संथच हाेता. त्यामुळे अनेक नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडील धानाचे अद्यापही माेजमाप करण्यात आलेले नाही. हा प्रकार आणखी किती दिवस सुरू राहणार, असा प्रश्न धान उत्पादकांनी उपस्थित केला आहे.

भरडाईचे दर अनिश्चित, राईस मिलर्सचा असहकारशासनाकडे धानाच्या भरडाईची काेणतीही व्यवस्था नसल्याने शासन दरवर्षी धान भरडाईसाठी खासगी राईस मिल मालकांसाेबत करार करते. यावर्षी भंडारा जिल्ह्यात २०५, तर गाेंदियामध्ये २४० राईस मिल मालकांसाेबत करार करण्यात आला. शासनाने भरडाईचे दर निश्चित न केल्याने मिल मालकांनी भरडाईला सुरुवातच केली नाही. त्यामुळे गाेदामांमधील धानाची वेळीच उचल न झाल्याने गाेदामे फुल्ल झालीत. 

बाेनस एप्रिलनंतरधानाला प्रति क्विंटल ७०० रुपये बाेनस देण्याची घाेषणा शासनाने केली हाेती. या ७०० रुपयांमध्ये २०० रुपये सानुग्रह अनुदान आहे. यासाठी ५० क्विंटलची मर्यादा आहे. बहुतांश शेतकऱ्यांना चुकारे अद्याप मिळालेले नसताना बाेनसची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एप्रिलनंतर जमा करण्यात येणार आहे.

बळीराजा भरडला इंद्रपाल कटकवारभंडारा : पावणे दोन लाख हेक्टरमध्ये धानाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर ऐन हंगामाच्या वेळी ‘डीओ’चा (डिमांड ऑर्डर) तिढा न सुटल्याने महिनाभरापर्यंत हजारो क्विंटल धान गोदामाबाहेर पडून होते. केंद्र आणि राज्य शासनाच्या कोंडीत बळिराजा भरडला गेला. याचवेळी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांत आलेल्या अवकाळी पावसाने धान ओले झाले. शेकडो क्विंटल धान पाखर (बेचव) झाल्याने त्याची शासकीय दराप्रमाणे उचल झाली नाही. परिणामी, हजारो क्विंटल धानाचे नुकसान बळिराजाला सोसावे लागले. दुसरीकडे, राज्य शासनाने घोषणा केल्याप्रमाणे प्रोत्साहन अनुदान निधीचा अजूनही थांगपत्ता नाही.

 

टॅग्स :nagpurनागपूर