पाचपावली रुग्णालयातील ऑक्सिजन टँक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:08 IST2021-05-12T04:08:18+5:302021-05-12T04:08:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेतर्फे पाचपावली सूतिकागृह परिसरामध्ये ११० खाटांचे कोविड रुग्णालय मंगळवारी सुरू करण्यात आले. ...

पाचपावली रुग्णालयातील ऑक्सिजन टँक सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतर्फे पाचपावली सूतिकागृह परिसरामध्ये ११० खाटांचे कोविड रुग्णालय मंगळवारी सुरू करण्यात आले. सर्व खाटांसाठी ऑक्सिजनची सुविधा करण्यात आली आहे. यासाठी लावण्यात आलेला लिक्विड ऑक्सिजन टँक कार्यान्वित करण्यात आला आहे. टँकची व्यवस्था असलेले हे मनपाचे पहिले रुग्णालय आहे.
यामुळे आता ऑक्सिजन सिलेंडर पुरवठ्यासाठी धावपळ होणार नाही. आसरा फाऊंडेशनच्या आसरा चॅरिटेबल मल्टिस्पेशिलिटी क्लिनिक, शांतिनगर संस्थेमार्फत या रुग्णालयाच्या संचालनात मदत होत आहे. मनपातर्फे येथे डॉक्टर व नर्सिंग स्टाफ इत्यादी नेमण्यात आला आहे. महापौर दयाशंकर तिवारी, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती संजय महाजन, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त मिलिंद मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर, आसीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड व झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता खंडाईत आदींनी मंगळवारी व्यवस्थेची पाहणी केली.