‘ऑक्सिजन कॉन्सट्रेटर’ आपत्कालीन परिस्थितीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST2021-04-05T04:07:36+5:302021-04-05T04:07:36+5:30

सहा लीटरपर्यंत ऑक्सिजन निर्मितीची क्षमता नागपूर : कोरोनाशी लढताना ऑक्सिजन किती महत्त्वाचे आहे, याची जाणिव सर्वांना झाली आहे. ऑक्सिजन ...

‘Oxygen Concentrator’ Emergency Basis | ‘ऑक्सिजन कॉन्सट्रेटर’ आपत्कालीन परिस्थितीचा आधार

‘ऑक्सिजन कॉन्सट्रेटर’ आपत्कालीन परिस्थितीचा आधार

सहा लीटरपर्यंत ऑक्सिजन निर्मितीची क्षमता

नागपूर : कोरोनाशी लढताना ऑक्सिजन किती महत्त्वाचे आहे, याची जाणिव सर्वांना झाली आहे. ऑक्सिजन संपल्याने रुग्ण दगावले, अशा बातम्या आता राज्याच्या कानाकोपऱ्यातून यायला लागल्या आहेत. सिलिंडरमधील ऑक्सिजन संपल्यावर रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी ‘ऑक्सिजन कॉन्संट्रेटर’ हे पर्याय म्हणून पुढे आले आहे. हे एक यंत्र असून, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांचा जीव वाचविण्यास उपयुक्त ठरत आहे.

नागपुरातील डॉ. राजकुमार कोसे यांच्या ८५ वर्षाच्या आईला कोरोनाचे संक्रमण झाले. त्यांच्या आईला ऑक्सिजनची नियमित गरज असल्याने त्यांनी ऑक्सिजन कॉन्संट्रेटरचा वापर केला. डॉ. कोसे म्हणाले की, लहान रुग्णालयात आणि घरातही याद्वारे रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करता येऊ शकतो. याद्वारे सहा लीटर प्रतिमिनिट ऑक्सिजन निर्माण होते. कोरोनाच्या ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे. पण, रुग्णालयात बेड उपलब्ध नाही. ऑक्सिजन संपलेले आहे. अशा रुग्णांसाठी हे यंत्र अतिशय उपयुक्त आहे. या यंत्रणामुळे रुग्णाची ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण करता येते. विशेष म्हणजे, हे यंत्र कुठेही घेऊन जाता येते.

Web Title: ‘Oxygen Concentrator’ Emergency Basis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.