गरिबी दूर करण्यासाठी वंचितांचा अभ्यास हवा
By Admin | Updated: December 2, 2014 00:37 IST2014-12-02T00:37:34+5:302014-12-02T00:37:34+5:30
स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरही देशात ७० टक्के जनता ही मूलभूत समस्यांचा सामना करीत आहे. आज देशातील गरिबीची समस्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही समस्या

गरिबी दूर करण्यासाठी वंचितांचा अभ्यास हवा
आशिष कोठारी : राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मृती व्याख्यानमाला संपन्न
नागपूर : स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरही देशात ७० टक्के जनता ही मूलभूत समस्यांचा सामना करीत आहे. आज देशातील गरिबीची समस्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी मूलभूत गरजांपासून किती लोक वंचित आहेत याचा अभ्यास करण्याची गरज आहे, असे मत पुणे येथील कल्पवृक्ष संस्थचे डॉ. आशिष कोठारी यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने दीक्षांत सभागृहात राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मृृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘इकॉलॉजिकल स्वराज : अॅन आॅल्टरनेटिव्ह टू डिस्ट्रक्टिव्ह ग्लोबलायझेशन’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
श्रीमंत अब्जोधीश होत आहते तर गरीब आहे तिथेच आहे. ही दरी वाढण्यासाठी जागतिकीकरणाची सुंदर आणि देखणी वाटणारी संकल्पना काही प्रमाणात कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते. कुठलीही धोरणे आखताना देशातील भांडवलदारांचा नव्हे तर सामान्य माणसाचा विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.
प्रत्यक्षात जागतिकीकरण ही भांडवलशाहीच्या जागतिकीकरणाची प्रक्रिया आहे आणि जो घाट तयार होत आहे तो जागतिकीकृत भांडवलशाहीचा आहे हे ध्यानात घेणे आवश्यक आह,े असेही त्यांनी प्रतिपादन केले.
यावेळी व्यासपीठावर प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे, डॉ. भारती उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. भारती यांनी केले. कार्यक्रमाला विभागप्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)