शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मातृशक्तीचा सर्वांगीण विकास आवश्यक : राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 23:42 IST

देशाला सुवर्णयुगाकडे नेण्यासाठी मातृशक्तीसोबतच प्रयत्न झाले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मातृशक्तीचादेखील सर्वांगीण विकास झाला पाहिजे, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘भारतीय महिलांची सद्यस्थिती’वरील अहवालाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशाच्या संस्कृती व संस्कारांचा पाया मातृशक्ती आहे. देश व समाज तिच्या माध्यमातून घडतो. देशाच्या विकासामध्ये मातृशक्तीचे मौलिक योगदान आहे. देशाला सुवर्णयुगाकडे नेण्यासाठी मातृशक्तीसोबतच प्रयत्न झाले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मातृशक्तीचादेखील सर्वांगीण विकास झाला पाहिजे, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे संयुक्तरीत्या आयोजित कार्यक्रमात ‘भारतीय महिलांची सद्यस्थिती’ या विषयावरील अहवालाचे गुरुवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. 

विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, नीती आयोगाच्या सदस्य बिंदू दालमिया, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू विनायक देशपांडे, राष्ट्र सेविका समिती प्रमुख संचालिका शांताक्का, दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र प्रकल्पाच्या सचिव अंजली देशपांडे, प्रकल्प संचालिका डॉ.मनिषा कोठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 
भारतीय महिलांमध्ये सहनशीलता मोठ्या प्रमाणावर दिसून येते. तसेच त्या जीवनात समाधानी जास्त लवकर होतात. त्यामुळे त्यांचा आनंदी राहण्याचा निर्देशांक हा उच्च आहे. भारतात पितृसत्ताक पद्धतीमध्ये मातृशक्तीला आदराचे आणि महत्त्वाचे स्थान आहे. सर्व क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने महिला कर्तृत्व सिद्ध करत आहेत. या अहवालातील बाबी या अनेक संदर्भात ऐतिहासिक ठरतील, असे प्रतिपादन राज्यपालांनी केले. आपल्याला ‘ इंडिया फर्स्ट, फॅमिली फर्स्ट’चे पालन करायला हवे. विधवांना उपेक्षित करणे आपल्या संस्कृतीत नाही, मात्र असे चित्र दुर्दैवाने दिसून येते. महिलांना निर्णयात्मक भूमिकेत सहभागी केल्यास हे चित्र बदलेल. ‘हॅपीनेस इंडेक्स’मध्ये महिलांना आर्थिक स्थितीतून मिळणाऱ्या आनंदात सहभागी करायला हवे. समाजाने मातृशक्ती व देशाच्या विकासात त्यांचे योगदान याचे कौतुक करायला हवे. महिलांचे मातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व यातून देश परत महाशक्ती होईल. ‘नीती’ आयोगाला धोरणनिर्मितीत या अहवालातून बरेच सहकार्य होणार आहे, असे मत बिंदु दालमिया यांनी व्यक्त केले. डॉ.देशपांडे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ.कोठेकर यांनी सादरीकरणातून प्रमुख निष्कर्षांवर प्रकाश टाकला. समृद्धी शिरगावकर यांनी संचालन केले.वास्तविक स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न : शांताक्काभारतीय स्त्री तिच्या कार्यकर्तृत्वाने तिची कुटुंबात, समाजात, देशात व्याप्ती वाढवते. मात्र आजदेखील अनेक महिलांचे शोषण होत आहे. समाजात अनेक प्रकारच्या विकृती आल्या आहेत. त्यामुळेच आम्ही महिलांची वास्तविक स्थिती जाणून घेण्याचा विचार केला. महिलांची अंतर्गत शक्ती काय आहे व त्या काय सकारात्मक करू शकतात, हे जाणून घेण्यावर भर दिला. यातून एक मोठे परिवर्तन येऊ शकते. या अभ्यासातून भारतीय मापदंड तयार करण्यात आले, असे प्रतिपादन शांताक्का यांनी केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ