३० दिवसांत ७० हजारांवर रुग्ण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:08 IST2021-05-30T04:08:11+5:302021-05-30T04:08:11+5:30

नागपूर : मागील काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घसरण होत आहे. २९ एप्रिल रोजी ७७,६२७ कोरोनाचे ...

Over 70,000 patients are cured in 30 days | ३० दिवसांत ७० हजारांवर रुग्ण बरे

३० दिवसांत ७० हजारांवर रुग्ण बरे

नागपूर : मागील काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घसरण होत आहे. २९ एप्रिल रोजी ७७,६२७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण होते. मात्र, मागील ३० दिवसांत ७०,१४९ रुग्ण बरे झाल्याने शनिवारी ही संख्या ७,४७८ वर आली आहे. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या ४००च्या आत होती. नागपूर जिल्ह्यात ३९२ रुग्ण १४ मृत्यूची नोंद झाली. यात शहरात २२४ रुग्ण व ५ मृत्यू, तर ग्रामीणमध्ये १६४ रुग्ण व ५ मृत्यू होते.

मे महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाचा धोका कमी होऊ लागला आहे. यातच ‘रिकव्हरी रेट’ म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी ९९३ रुग्ण बरे झाले असून, कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा दर ९६ टक्क्यांवर गेला आहे. सध्या ५०८० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, तर २,३९८ रुग्ण शासकीयसह विविध खासगी व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. आतापर्यंत ४,५७,५७२ रुग्ण बरे झाले आहेत. यात शहरातील ३,२१,५७५, तर ग्रामीणमधील १,३५,९९७ रुग्ण आहेत.

-आठवड्याभरात ३,९१२ रुग्ण व १३५ मृत्यूची नोंद

नागपूर जिल्ह्यात २३ ते २९ मे या आठवड्यात ३,९१२ रुग्ण व १३५ मृत्यूची नोंद झाली, तर १६ ते २२ मे या आठवड्यात ७,९०७ रुग्ण, २२४ मृत्यूची भर पडली होती. एकूणच जवळपास दुपटीने रुग्णसंख्या कमी झाली आहे. २३ मे नंतर एकदाही रुग्णसंख्या हजारावर गेली नाही. सलग पाच दिवस रुग्णसंख्या ५०० च्या खाली होती. यावरून स्थिती नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे.

:: कोरोनाची शनिवारची स्थिती

दैनिक चाचण्या : १३,४४१

शहर : २२४ रुग्ण व ५

ग्रामीण : १६४ रुग्ण व ५

एकूण बाधित रुग्ण :४,७३,९२९

एकूण सक्रिय रुग्ण : ७,४७८

एकूण बरे झालेले रुग्ण : ४,५७,५७२

एकूण मृत्यू : ८८७९

Web Title: Over 70,000 patients are cured in 30 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.