शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

घातक झिका विषाणूचा देशात उद्रेक : चंद्रशेखर मेश्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:38 IST

पाश्चात्त्य देशांमध्ये दहशत पसरविणाऱ्या झिका विषाणूचा (व्हायरस) रुग्ण यावर्षी राजस्थानची राजधानी जयपूर येथे दिसून आला. २१ सप्टेंबरला पहिल्या रुग्णाची नोंद झाल्यानंतर आतापर्यंत १४९ रुग्ण आढळून आले. यात ४० गर्भवती महिलांचाही समावेश आहे. मागच्या वर्षी गुजरात आणि तामिळनाडूमध्ये चार रुग्णांची नोंद झाली होती. ‘एडिस इजिप्ती’ हा डास चावल्यामुळेच झिकाचा विषाणू पसरतो. प्रथमच जयपूरमध्ये झिका विषाणू डासामध्ये आढळून आला. याच डासामुळे डेंग्यू व चिकनगुनिया पसरतो. यामुळे इतर भागात हा रोग पसरण्याची शक्यता आहे, अशी माहिती ‘नॅशनल ब्रेन वीक’चे राष्ट्रीय समन्वयक व जागतिक ट्रॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.

ठळक मुद्दे १४९ रुग्णांची नोंद, यात ४० गर्भवती महिलांचा समावेशराष्ट्रीय ब्रेन सप्ताह आजपासून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाश्चात्त्य देशांमध्ये दहशत पसरविणाऱ्या झिका विषाणूचा (व्हायरस) रुग्ण यावर्षी राजस्थानची राजधानी जयपूर येथे दिसून आला. २१ सप्टेंबरला पहिल्या रुग्णाची नोंद झाल्यानंतर आतापर्यंत १४९ रुग्ण आढळून आले. यात ४० गर्भवती महिलांचाही समावेश आहे. मागच्या वर्षी गुजरात आणि तामिळनाडूमध्ये चार रुग्णांची नोंद झाली होती. ‘एडिस इजिप्ती’ हा डास चावल्यामुळेच झिकाचा विषाणू पसरतो. प्रथमच जयपूरमध्ये झिका विषाणू डासामध्ये आढळून आला. याच डासामुळे डेंग्यू व चिकनगुनिया पसरतो. यामुळे इतर भागात हा रोग पसरण्याची शक्यता आहे, अशी माहिती ‘नॅशनल ब्रेन वीक’चे राष्ट्रीय समन्वयक व जागतिक ट्रॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.

इंडियन अ‍ॅकेडमी आॅफ न्यूरालॉजीच्यावतीने १६ ते २४ डिसेंबर दरम्यान देशभर राष्ट्रीय ‘ब्रेन सप्ताह’ पाळला जाणार आहे. त्यानिमित्ताने त्यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. मेंदूसंबंधी व मेंदू आरोग्याविषयी जनजागृती करणे आणि मेंदू आजारांचा दर घटविणे हे या सप्ताहाचे उद्देश आहे. डॉ. मेश्राम म्हणाले, गेल्या दशकात मेंदूचे कार्य व मज्जा रोगावर अनेक संशोधन झाले. नव्या तपासण्या, नवे तंत्र, नवी औषधे, अनेक नव्या उपचार पद्धती शोधण्यात आल्यात. परंतु दुर्दैवाने अनेक रुग्ण अद्यापही या सेवेपासून वंचित आहेत. याचे कारण समाजात अनेक गैरसमज व अज्ञान आहे. यामुळे व्यापक प्रमाणात जनजागृतीची गरज आहे, असेही ते म्हणाले.८० टक्के लोकांना काहीच त्रास होत नाहीझिका विषाणू सर्वप्रथम १९४७ मध्ये रीसस जातीच्या माकडामध्ये युगांडा येथील झिघा जंगलात आढळून आला. २०१५ मध्ये दक्षिण अमेरिकन देशात या रोगाची मोठ्या प्रमाणात लागण झाली. एकट्या ब्राझीलमध्ये १७ लाख रुग्णांची नोंद झाली.डास चावल्यामुळे, शारीरिक संबंधामुळे आणि दूषित रक्त दिल्यामुळे हा रोग पसरतो. या रोगाचा सर्वात मोठा धोका गर्भवती महिलांना आणि गर्भातील बालकांना असतो. या विषाणुमुळे गर्भातील बाळाच्या मेंदूची वाढ खुंटते. मेंदू विकसित न झालेले बाळ जन्माला येते. यालाच ‘मायक्रोसेफॅली’ असे म्हटले जाते. ब्राझील येथे २०१५-२०१६ दरम्यान ३५०० बालकांना ‘मायक्रोसेफॅली’ झाल्याचे निदर्शनास आले होते. ताप येणे, अंगावर व्रण उठणे, खाज येणे, डोके, अंगदुखी, डोळे येणे ही या रोगाची लक्षणे असतात. मात्र, विषाणू असलेल्या ८० टक्के लोकांना काहीच त्रास होत नाही, असेही डॉ. मेश्राम म्हणाले.

झिकावर औषधी उपलब्ध नाही

 डॉ. मेश्राम म्हणाले, झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीसाठी कोणत्याही प्रकारची औषधे किंवा हा रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधक लससुद्धा उपलब्ध नाही. म्हणून डास चावू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. डासावर नियंत्रण आणणे हे या रोगापासून संरक्षण करण्याकरिता महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Zika Virusझिका वायरसdoctorडॉक्टर