... अन्यथा घराबाहेर पडण्यावर बंदी घालावी लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:08 IST2021-04-18T04:08:36+5:302021-04-18T04:08:36+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : काेराेना संक्रमणाचा वाढता वेग लक्षात घेता, ताे राेखण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, तसेच ...

... अन्यथा घराबाहेर पडण्यावर बंदी घालावी लागेल
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : काेराेना संक्रमणाचा वाढता वेग लक्षात घेता, ताे राेखण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, तसेच मास्कचा नियमित वापर करावा, असे आवाहन खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याचे ठाणेदार अजय मानकर यांनी केले आहे. नागरिकांनी बेजबाबदारपणे वागणे न साेडल्यास, त्यांना घराबाहेर पडण्यावर बंदी घालावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
पाेलीस व स्थानिक नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि.१६) सायंकाळी खापा शहारात काेराेना संक्रमण राेखण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली. या दरम्यान, नागरिकांना आवाहन करताना त्यांनी सांगितले की, काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन आणि संचारबंदी जाहीर केली आहे. या दाेन्ही बाबींचा अर्थ नागरिकांनी समजून घ्यावा. राज्यात शासनाने साथराेग प्रतिबंधक कायदाही लागू केला आहे. त्यामुळे काेराेना संक्रमण राेखण हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.
त्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, घराबाहेर पडताना मास्कचा नियमित वापर करावा, गर्दी करून नये व गर्दी जाणे टाळावे, खरेदी करताना दुकानासमाेर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, यासह अन्य उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करावे, तसेच या संकटाच्या काळात पाेलीस व पालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. मात्र, नागरिकांनी बेजबाबदारपणा दाखविल्यास त्यांच्यावर घराबाहेेर पडण्यास नाईलाजास्तव बंदी घालावी लागेेल. सध्या अनेक दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहने राेडवर फिरताना दिसून येतात. नागरिकांनी या प्रकाराला आवर घातला नाही, तर संबंधितांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी लागेल, असेही ठाणेदार अजय मानकर यांनी केले.