उपराजधानीत महाविकास आघाडीसह अन्य पक्ष उतरले रस्त्यावर; कोराडी नाका येथे चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 13:06 IST2020-12-08T13:05:47+5:302020-12-08T13:06:10+5:30
Bharat Band Nagpur News केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या ८ डिसेंबरच्या बंदसाठी नागपुरात महाविकास आघाडीसह अन्य राजकीय पक्षही रस्त्यावर उतरले.

उपराजधानीत महाविकास आघाडीसह अन्य पक्ष उतरले रस्त्यावर; कोराडी नाका येथे चक्काजाम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या ८ डिसेंबरच्या बंदसाठी नागपुरात महाविकास आघाडीसह अन्य राजकीय पक्षही रस्त्यावर उतरले. नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे रस्त्यावर फिरून जनतेला शांततेत भारत_बंदला समर्थन करण्याचे आवाहन करीत होते. आपच्या कार्यकर्त्यांनी झाशी राणी चौकात निदर्शने केली. कोराडी नाका येथेअ.भा. काँग्रेस कमिटी हिंगणा मतदारसंघातील नेत्या कुंदाताई राऊत यांच्या नेतृत्वात बंदसाठी आवाहन करण्यात आले. यावेळी कोराडी नाका परिसर पूर्णत: बंद ठेवण्यात आला होता.