नागपुरात मृत्यूचे तांडव, ११३ ‘कोरोना’ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:08 IST2021-04-20T04:08:10+5:302021-04-20T04:08:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोना आणखी घातक ठरण्याची चिन्हे दिसून येत आहेत. सोमवारी एकाच ...

Orgy of death in Nagpur, 113 'Corona' victims | नागपुरात मृत्यूचे तांडव, ११३ ‘कोरोना’ बळी

नागपुरात मृत्यूचे तांडव, ११३ ‘कोरोना’ बळी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोना आणखी घातक ठरण्याची चिन्हे दिसून येत आहेत. सोमवारी एकाच दिवसात जिल्ह्यात ११३ जणांचा बळी गेला. आतापर्यंत २४ तासातील ही सर्वाधिक मृत्युसंख्या ठरली. ६ हजार ३६४ नवे बाधित आढळून आले असून मृत्यूच्या वाढत्या संख्येमुळे जनतेसोबत प्रशासनामध्येदेखील दहशत निर्माण झाली आहे.

जिल्ह्यामध्ये आढळलेल्या एकूण बाधितांपैकी ४ हजार ५७८ शहरातील असून १ हजार ७८० ग्रामीण भागातील आहेत. मृतकांमध्ये शहरातील ७५, ग्रामीणमधील ३२ व जिल्ह्याबाहेरील सहा जणांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३ लाख २९ हजार ४७० बाधित व ६ हजार ३८६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

चाचण्यांची संख्या घटली, बरे होणारे वाढले

सोमवारच्या अहवालानुसार ५ हजार ९७ बाधित ठीक झाले. यात शहरातील ३ हजार ९९७, तर ग्रामीणमधील १ हजार १०० जणांचा समावेश आहे. दुसरीकडे चाचण्यांची संख्या मात्र घटली. १७ हजार ९७८ जणांची चाचणी झाली. यात शहरातील १३ हजार ३९८ व ग्रामीणमधील ४ हजार ५८० जणांचा समावेश होता.

सक्रिय रुग्ण ७० हजारापार

जिल्ह्यात ७० हजार ३९७ सक्रिय रुग्ण आहेत. यात शहरातील ४२ हजार २८५ व ग्रामीणमधील २८ हजार ११२ जणांचा समावेश आहे. सरकारी व खासगी रुग्णालयांत २० हजार २४६ रुग्ण दाखल आहेत, तर ५० हजार १५१ रुग्ण ‘होम आयसोलेशन’मध्ये आहेत.

असे वाढले मृत्यू

...

दिनांक -मृत्यू-नवे ‘पॉझिटिव्ह’

१५ एप्रिल- ७४ -५,८१३

१६ एप्रिल- ७५ -६,१९४

१७ एप्रिल- ७९ -६,९५६

१८ एप्रिल- ८५ -७,१०७

१९ एप्रिल- ११३ -६,३६३

Web Title: Orgy of death in Nagpur, 113 'Corona' victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.