शहरं
Join us  
Trending Stories
1
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
4
पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चा गॅरेंटिड रिटर्न, पाहा संपूर्ण गणित
5
'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार एकत्र, राहाला कसा वेळ देतात रणबीर-आलिया? अभिनेत्री म्हणाली...
6
रॉस टेलरने निवृत्ती घेतली मागे, न्यूझीलंड सोडून बाहेर पडला, आता 'या' देशाकडून खेळणार क्रिकेट
7
Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; निफ्टीही वाढला; 'हे' स्टॉक्स चमकले
8
GST बदल! माझ्या कुटुंबाला फायदा किती?; मासिक बजेटवरचा भार हलका होणार, गणित समजून घ्या
9
अरे देवा, खूपच वाईट! आधी २ वर्षाच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकले, नंतर आईने मारली उडी
10
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
11
अभिनेत्रीच्या जुळ्या मुली अन् आईवडील हिमाचलमध्ये अडकले; म्हणाली, "चार दिवसांपासून..."
12
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
13
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
14
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
15
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
16
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
17
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
18
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
19
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
20
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?

अवयवरुपे उरावे... ब्रेनडेड महिलेच्या अवयवदामुळे दोघांना नवजीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 11:26 IST

भावना यांच्या उपचारादरम्यान मेंदूपेशी मृत झाल्याचे निदान उपचारादम्यान डॉक्टरांनी केले. तसेच, कुटुंबीयांचे समुपदेशन करीत अवयवदान करण्याचा सल्ला दिला. भावना यांचे पती मुलाने दु:खातही पुढाकार घेत अवयवदानाला होकार दिला.

ठळक मुद्देकेयल कुटुंबाचा पुढाकार

नागपूर : झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’च्या (झेडटीसीसी) मार्गदर्शनात मंगळवारी ७९व्या मेंदू मृत (ब्रेनडेड) व्यक्तीचे मंगळवारी अवयवदान करण्यात आले. केयल कुटुंबाच्या पुढाकारामुळे या अवयवदानातून दोन रुग्णांना जीवनदान मिळाले.

भावना बालमुकुंद केयल (४८) रा.भांडेवाडी असे त्या अवयवदात्याचे नाव. प्राप्त माहितीनुसार, भावना यांच्यावर चार वर्षांपूर्वी मेंदूवर शस्त्रक्रिया झाली होती. तिची २५ नोव्हेंबरला अचानक प्रक्रृती खालावल्याने तिला लगडगंज येथील न्यू ईरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना २९ नोव्हेंबर रोजी तिचा मेंदू मृत झाल्याची माहिती डॉक्टरांनी कुटुंबीयांना दिली.

न्यू ईरा रुग्णालयातील हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ.आनंद संचेती व मेंदूरोग तज्ज्ञ डॉ.नीलेश अग्रवाल यांनी कुटुंबीयांचे समुपदेशन करीत अवयवदान करण्याचा सल्ला दिला. भावना यांचे पती बालमुकुंद व मुलगा शुभम केयल यांनी त्या दु:खातही पुढाकार घेत अवयवदानाला होकार दिला. याची माहिती विभागीय प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ.विभावरी दाणी व सचिव डॉ.संजय कोलते यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात समितीच्या समन्वयक विना वाठोरे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार, न्यू ईरा रुग्णालयातील ५६ वर्षीय पुरुषाला यकृत तर ५४ वर्षीय महिलेला मूत्रपिंड दान करून त्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. दुसरे मूत्रपिंड योग्य नसल्याचे निदर्शनात आल्याने त्याचे प्रत्यारोपण होऊ शकले नाही.

टॅग्स :Healthआरोग्यSocialसामाजिकOrgan donationअवयव दान