बुद्ध पौर्णिमेला विविध कार्यक्रमांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST2021-05-25T04:08:42+5:302021-05-25T04:08:42+5:30

अत्तं दीपं भवं संगीतमय कार्यक्रम दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने बुद्ध जयंतीच्या निमित्ताने २६ मे रोजी सकाळी ११ ...

Organizing various programs on Buddha Pournima | बुद्ध पौर्णिमेला विविध कार्यक्रमांचे आयोजन

बुद्ध पौर्णिमेला विविध कार्यक्रमांचे आयोजन

अत्तं दीपं भवं संगीतमय कार्यक्रम

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने बुद्ध जयंतीच्या निमित्ताने २६ मे रोजी सकाळी ११ वाजता अत्त दीप भवं हा ऑनलाइन संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गौतम बुद्धांवरील गीतांचे सादरीकरण यावेळी पार्श्वगायिका आकांक्षा नगरकर-देशमुख, पीयूष वाघमारे गाणी सादर करतील. वाद्यांवर श्रीकांत पिसे, अरविंद उपाध्ये, राहुल देशमुख, पंकज यादव, अक्षय हरले संगत करतील. संचालनाची बाजू विक्रम मोरे सांभाळतील.

सामूहिक विपश्यना ध्यान साधना

विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे बुधवारी सकाळी ८ ते १० वाजतापर्यंत सामूहिक विपश्यना ध्यान साधनेचे आयोजन होईल. सकाळी १०.३० वाजता भिक्षू संघाच्या उपस्थितीत विशेष बुद्धवंदना व धम्मदेसनाचे आयोजन होईल. यावेळी ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते भिक्षू संघाला कठीण चिवर दान दिले जाईल. संध्याकाळी ७ वाजता शांतीमार्चचे आयोजन करण्यात आले आहे.

बुद्धिस्ट एकांकिका लेखन स्पर्धा

बहुजन रंगभूमी, द बुद्धिस्ट थिएटर ऑफ इंडिया व अश्वघोष कला अकादमीच्या वतीने बुद्ध जयंतीच्या निमित्ताने बुद्धिस्ट एकांकिका लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १४ वर्षांवरील जगातील कुठलीही व्यक्ती या स्पर्धेत सहभागी होऊन मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत बुद्ध जीवन, धम्म, मार्ग व कार्यावर आधारित नवीन एकांकिका लिहून पाठवू शकतो. २५ जुलैपर्यंत या एकांकिका पाठविण्याचे आवाहन वीरेंद्र गणवीर, उत्कर्ष तायडे, डिम्पल पाटील, रिशिल ढोबळे, सुरेंद्र वानखेडे, आशीष दुर्गे, अस्मिता पाटील, रोहित लोखंडे, शिवम मस्के यांनी केले आहे.

...................

Web Title: Organizing various programs on Buddha Pournima