राष्ट्रीय रेफरी सेमिनारचे आयाेजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:07 IST2021-07-16T04:07:15+5:302021-07-16T04:07:15+5:30

काटाेल : जम्प रोप फेडरेशन ऑफ इंडिया आणि जम्प रोप असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे दाेन दिवसीय ...

Organizing National Referee Seminar | राष्ट्रीय रेफरी सेमिनारचे आयाेजन

राष्ट्रीय रेफरी सेमिनारचे आयाेजन

काटाेल : जम्प रोप फेडरेशन ऑफ इंडिया आणि जम्प रोप असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे दाेन दिवसीय वेस्ट झोन जम्प रोप राष्ट्रीय रेफरी सेमिनारचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते.

या सेमिनारमध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान, दादर नगर हवेली या राज्यातील मास्टर्स सहभागी झाले होते. यात नागपूर जिल्ह्यातील किरण यादव, तुषार डोईफोडे, प्राजन्य चरडे व करण ठाकरे यांचा समावेश हाेता. किरण यादव यांनी राष्ट्रीय जम्प रोप रेफरी परीक्षा उत्तीर्ण केली असून, त्यांची नागपूर विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. किरण यादव, नरेंद्र बिहार, खुशाल इंगोले, अश्विनी राऊत, शुभम पडोळे, शेख जावेद, सुमित नागदवणे यांचीही रेफरी म्हणून निवड करण्यात आली.

Web Title: Organizing National Referee Seminar