लोकमत समूहाचे आयोजन : ‘मिशन अ‍ॅडमिशन एक्सपो’मध्ये हरवले पालक, विद्यार्थी

By Admin | Updated: May 2, 2015 02:26 IST2015-05-02T02:26:00+5:302015-05-02T02:26:00+5:30

या एक्स्पोचा आनंद घेण्यासाठी लोकमत सखी मंचचे सदस्य, लोकमत युवा नेक्स्टचे सदस्य आणि लोकमत कॅम्पस क्लबचे लहान सदस्य त्यांच्या पालकांसह आमंत्रित आहेत.

Organizing Lokmat group: Parents, students lost in 'Mission Admission Expo' | लोकमत समूहाचे आयोजन : ‘मिशन अ‍ॅडमिशन एक्सपो’मध्ये हरवले पालक, विद्यार्थी

लोकमत समूहाचे आयोजन : ‘मिशन अ‍ॅडमिशन एक्सपो’मध्ये हरवले पालक, विद्यार्थी

पहिलाच दिवस ‘हाऊसफुल्ल’
लहान मुले आमंत्रित

या एक्स्पोचा आनंद घेण्यासाठी लोकमत सखी मंचचे सदस्य, लोकमत युवा नेक्स्टचे सदस्य आणि लोकमत कॅम्पस क्लबचे लहान सदस्य त्यांच्या पालकांसह आमंत्रित आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येकालाच नि:शुल्क प्रवेश देण्यात येणार आहे.

रोज मिळणार लकी ड्रॉचे पुरस्कार

येथे येणाऱ्या प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांच्या नावाचा लकी ड्रॉ काढण्यात येत आहे. आजच्या लकी ड्रॉ चे विजेते पंकज ए. कोडावार होते. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लकी ड्रॉ योजनेत सहभागी होण्याची संधी मिळते आहे. प्रत्येक दिवसाच्या अखेरीस लकी ड्रॉ काढण्यात येईल आणि भाग्यशाली विजेत्यांना भरघोस पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.

फॅन्सी ड्रेस स्पर्धेत चिमुकल्यांनी दाखविली प्रतिभा
एक्स्पो अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आज फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आधारित ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात शालेय विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत विविध पारंपरिक पेहरावांचे सादरीकरण केले. या स्पर्धेत प्रथम पुरस्कार - मनस्वी मांगे, द्वितीय पुरस्कार रिया नगराळे आणि तृतीय पुरस्कार शौर्य कोहळे यांना प्रदान करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण प्रणाली खरवडे आणि प्रीती वालधूरकर यांनी केले. एक्स्पोमध्ये रोज दुपारी ३ वाजता स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्पर्धा नि:शुल्क आहेत. स्पर्धेत ५ ते १४ वर्षांचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. यातील विजेत्यांना पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येणार असून स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी नोंदणीसाठी फोन क्रमांक ९९२२२०००६३ किंवा ९८२२४०६५६२ वर संपर्क साधावा.

किल्ले तयार करण्याच्या प्रशिक्षणात रंगली मुले
महाराष्ट्र दिनानिमित्त मुलांमध्ये प्राचीन किल्ले आणि स्थापत्यशास्त्राबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी किल्ले तयार करण्याचे प्रशिक्षण शिबिर एक्स्पोत घेण्यात आले. याप्रसंगी मुलांना किल्ले तयार करण्याचे नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात आले. किल्ल्याच्या प्रतिकृतीसाठी शिल्पकार अतुल गुरु यांनी मुलांना मार्गदर्शन करुन किल्ल्यांचे महत्त्व आणि त्याकाळात असणारे स्थापत्यशास्त्र याची माहिती दिली. याप्रसंगी मुलांनीही विविध प्रश्न विचारून त्यांचे समाधान करून घेतले. रेल्वेत काम करणाऱ्या अतुल यांनीही मुलांना किल्ल्यांबाबत मार्गदर्शन केले.

आज होणार चित्रकला स्पर्धा
एक्स्पोत शनिवार २ मे रोजी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात सहभागी स्पर्धकांना केवळ रंग घेऊन यावे लागेल. ड्रॉर्इंग शीट नि:शुल्क प्रदान करण्यात येईल. येथे येणाऱ्या सर्व मुलांना पारितोषिकाने सन्मानित करण्यात येणार आहे. ३ मे रोजी ज्युनिअर मास्टर शेफ स्पर्धा होईल. यात स्पर्धकांना न तळता आणि न भाजता व्यंजन तयार करावे लागतील. उदा. सलाद, चाट, सँडविच असे पदार्थ यात असतील.

Web Title: Organizing Lokmat group: Parents, students lost in 'Mission Admission Expo'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.