माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:44 IST2021-02-05T04:44:28+5:302021-02-05T04:44:28+5:30

नागपूर : अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा व माजी विद्यार्थी समिती पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ...

Organizing alumni meet | माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

नागपूर : अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा व माजी विद्यार्थी समिती पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन पाटील, डॉ. रवींद्र नानवटकर, प्रकाश गुलदेवकर, प्रा. संतोष मून, डॉ. प्रमोद कोठीवाले, प्रा. मुरलीधर वाकोडे प्रामुख्याने उपस्थित होते. माजी विद्यार्थी मेळाव्यातून ज्ञानसंवर्धन, भविष्यकालीन योजना, नवे बदल आणि भावनिक ऋणानुबंध एका सूत्रात जोडले जातात, असे प्रतिपादन डॉ. पाटील यांनी केले. यावेळी २०२०-२१ ते २०२२-२३ साठी माजी विद्यार्थी कार्यकारिणी घोषित करण्यात आली. अध्यक्ष म्हणून प्रा. वाकोडे, तर उपाध्यक्षपदी तुषार चौधरी यांची निवड झाली. डॉ. एम. आर. ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. बी. व्ही. श्रीगिरिवार, डॉ. बी. जी. बगडे, डॉ. प्रवीण भगडीकर, प्रा. डी. बी. अंबाडे, डॉ. आर. एस. लोणारे, धांडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Organizing alumni meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.