ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लोकमत आणि संकल्पच्यावतीने आयोजन
By Admin | Updated: October 7, 2016 03:06 IST2016-10-07T03:06:23+5:302016-10-07T03:06:23+5:30
लोकमत सखी मंचच्या संस्थापक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लोकमत आणि संकल्पच्या वतीने विभागीय क्रीडा संकुलाच्या इनडोअर स्टेडियममध्ये

ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लोकमत आणि संकल्पच्यावतीने आयोजन
मातेच्या आराधनेत थिरकताहेत पावले
नागपूर : लोकमत सखी मंचच्या संस्थापक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लोकमत आणि संकल्पच्या वतीने विभागीय क्रीडा संकुलाच्या इनडोअर स्टेडियममध्ये भव्य दांडिया गरबाचे आयोजन करण्यात आले आहे. यात भाविक मोठ्या संख्येने उत्साहात नृत्य सादर करीत आहेत. दांडिया गरबाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी गरबात मोठा उत्साह पाहावयास मिळाला. येथे थिरकणाऱ्या सर्वच वयोगटातील नागरिकांनी गरबाचा आनंद घेतला. यात गरबा पोशाखात आलेल्या युवकांमध्ये विशेष उत्साह संचारला होता. बहुतांश युवक गरब्याच्या पेहरावात सामील झाले होते तर युवतींनी रंगीबेरंगी लाचा परिधान केला होता.
आज हंगामा टाइम्सच्या कलावंतांनी मातेच्या आराधनेत ‘पंखिडा तु उड के जाना पावागड रे’ हे गीत सादर केले. त्याच बरोबर ‘घुंघट मे चांद होगा, आंचल मे चांदनी’ अशी गीते सादर करून युवकांमध्ये उत्साह भरला. अधूनमधून ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ यासारख्या लोकप्रिय गीतांवरही नागरिकांना थिरकरण्यास भाग पाडले. बुधवारी अॅड. एस. टी. मदनानी आणि संकल्पचे चेअरमन विपीन कामदार यांच्या हस्ते गरबा उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. आज कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संकल्पच्या सदस्य तृप्ती कामदार, निपा पी. दाठिया, चंद्रेश बदानी, दीप्ती जय टी. जोशी, वीणा प्रफुल्ल दोशी, निता विरल कोठारी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
गरबाच्या विशेष संकल्पनेवर पुरस्कार
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विविध रंगांची संकल्पना ठेवण्यात आली आहे. नृत्य करणारे पुरुष, महिला, मुले आणि जोडप्यांसाठी बेस्ट ड्रेस, बेस्ट गरबा प्लेअर, बेस्ट दांडिया, गरबा प्लेईंग ग्रुपच्या आधारावर दररोज विजेत्यांची निवड करून त्यांना पुरस्कार देण्यात येत आहेत.