जैविक खतांमुळे कृषी भूमीचे पोषण : पल्लेवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:09 IST2021-06-09T04:09:50+5:302021-06-09T04:09:50+5:30
नागपूर : जैविक खतांमुळे कृषी भूमीचे सुपोषण उत्तम होते, अशी भावना ग्रामायण कृषी प्रबोधन या ऑनलाईन कार्यक्रमात यशवंत पल्लेवार ...

जैविक खतांमुळे कृषी भूमीचे पोषण : पल्लेवार
नागपूर : जैविक खतांमुळे कृषी भूमीचे सुपोषण उत्तम होते, अशी भावना ग्रामायण कृषी प्रबोधन या ऑनलाईन कार्यक्रमात यशवंत पल्लेवार यांनी व्यक्त केली.
आपल्या देशात मूलत: रासायनिक, शेणखत व हिरवळीचे खत अशी तीन प्रकारची खते वापरून शेती केली जाते. रासायनिक खतांमुळे जमिनीची पोषण क्षमता नष्ट होऊन ती नापिक होते. शेणखताची प्रक्रिया कठीण आहे व ती पूर्ण न झाल्यास नुकसान होते, तर हिरवळीच्या खतावर मर्यादा आहेत. भारतीय कृषी अनुसंधान संस्था, नवी दिल्लीने जैविक खतांवर संशोधन करून शेतकऱ्यांना भूमी सुपोषणासाठी एक संजीवनी दिल्याचे मत यशवंत पल्लेवार यांनी व्यक्त केले. यावेळी कृषितज्ज्ञ डॉ. बी.एम. अडेराव यांचे अनुभवकथन झाले. शिरीष गोल्हर यांनी परिचय करून दिला. संजय सराफ यांनी प्रास्ताविक केले. आभार चंद्रकांत रागीट यांनी मानले.
..................