जि.प.च्या २२६ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी
By Admin | Updated: June 19, 2014 01:02 IST2014-06-19T01:02:44+5:302014-06-19T01:02:44+5:30
जिल्हा परिषदेतील २२६ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी बुधवारी जारी केले.

जि.प.च्या २२६ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी
नागपूर : जिल्हा परिषदेतील २२६ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी बुधवारी जारी केले.
राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमुळे २१ मे रोजी बदल्यांना स्थगिती दिली होती. दरम्यान शासनाने जि.प.कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची निवडणूक आयोगाकडे अनुमती मागितली होती. आयोगाने शिक्षक संवर्ग वगळता इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची अनमुती दिली आहे.
जि.प.स्तरावर बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात सामान्य प्रशासन विभागातील ८६, पंचायत विभाग ३२, वित्त १२, कृषी १, आरोग्य ६९, बांधकाम ९, पशुसंवर्धन ५, महिला व बालकल्याण ४, ग्रामीण पाणीपुरवठा, लघुसिंचन विभागातील ८ अशा २२६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
बदल्यांची प्रक्रि या नियमानुसार, कर्मचाऱ्यांचा पसंतीक्र म विचारात घेऊन पारदर्शी पद्धतीने करण्यात आल्या. याबद्दल कास्ट्राईब जि.प.कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोहन चवरे, नरेंद्र धनविजय, निरंजन पाटील, राजेंद्र किंदर्ले, मिथिलेश देशमुख, अशोक रवारे, प्रशांत साखरकर आदींनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)