शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाचा आदेश : विदर्भ हॉकी संघटनेवर प्रशासक नियुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 21:11 IST

अंतर्गत वादामुळे अस्थिर झालेल्या विदर्भ हॉकी संघटनेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी धर्मादाय उपायुक्तांना दिला.

ठळक मुद्देसर्वमान्य निवड समिती निवडेल संघ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंतर्गत वादामुळे अस्थिर झालेल्या विदर्भहॉकी संघटनेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी धर्मादाय उपायुक्तांना दिला.येत्या २२ एप्रिल रोजी संघटनेतील सर्व गटांनी धर्मादाय उपायुक्तांसमक्ष हजर होऊन आपापले लेखी उत्तर सादर करावे व संघटनेवर प्रशासक म्हणून नियुक्त करण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील सक्षम व्यक्तीची नावे सुचवावी असेही न्यायालयाने सांगितले. तसेच, सर्वानुमते स्थापन करण्यात आलेली निवड समिती ही, संघटनेमध्ये सर्वकाही सुरळीत होतपर्यंत, विविध हॉकी स्पर्धांसाठी विदर्भ संघाची निवड करेल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.अंतर्गत वादामुळे विदर्भ हॉकी संघटनेची सदस्यता निलंबित करण्यात आली आहे. यासंदर्भात हॉकी इंडियाचे कार्यकारी संचालकांनी ७ जानेवारी २०१९ रोजी आदेश जारी केला आहे. त्याविरुद्ध संघटनेचे अध्यक्ष बी. सी. भरतिया व सचिव विनोद गवई यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संघटनेतील अंतर्गत वादासंदर्भात हॉकी इंडियाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. हॉकी इंडियाचे अध्यक्ष व सचिव यांनी त्या तक्रारींची दखल घेऊन विदर्भ हॉकी संघटनेचे सदस्यत्व निलंबित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार वादग्रस्त आदेश जारी करण्यात आला. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. रोहित शर्मा यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयHockeyहॉकीVidarbhaविदर्भ