शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक मंचचा आदेश : ३.८५ लाख रुपये १६ टक्के व्याजासह परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 23:30 IST

तक्रारकर्त्या ग्राहकाचे ३ लाख ८५ हजार रुपये १६ टक्के व्याजासह परत करण्यात यावे असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने सिरसपेठ येथील गजानन लॅन्ड डेव्हलपर्सला दिला. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार अशी एकूण ६० हजार रुपयाची भरपाई मंजूर केली. ही रक्कमही डेव्हलपर्सने द्यायची आहे.

ठळक मुद्देगजानन लॅन्ड डेव्हलपर्सला चपराक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाचे ३ लाख ८५ हजार रुपये १६ टक्के व्याजासह परत करण्यात यावे असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने सिरसपेठ येथील गजानन लॅन्ड डेव्हलपर्सला दिला. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार अशी एकूण ६० हजार रुपयाची भरपाई मंजूर केली. ही रक्कमही डेव्हलपर्सने द्यायची आहे.मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य नितीन घरडे व चंद्रिका बैस यांनी हा निर्णय दिला. ३ लाख ८५ हजार रुपयावर २८ सप्टेंबर २०१५ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत १६ टक्के व्याज लागू करण्यात आले आहे. या निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी डेव्हलपर्सला ३० दिवसाची मुदत देण्यात आली आहे. या निर्णयामुळे डेव्हलपर्सला जोरदार चपराक बसली.खेमराज खापर्डे असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव असून ते सोमलवाडा येथील रहिवासी आहेत. त्यांनी गजानन लॅन्ड डेव्हलपर्सच्या मौजा खलासना, ता. कुही येथील श्री गजानन नगरी-१ ले-आऊट (खसरा क्र. १६२/२)मधील १९२७.४६ चौरसफुटाचा भूखंड ३ लाख ८७ हजार ४२० रुपयांत खरेदी केला होता. त्यानंतर त्यांनी डेव्हलपर्सला वेळोवेळी एकूण ३ लाख ८५ हजार रुपये दिले. तसेच, भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्याची मागणी केली. परंतु, डेव्हलपर्सने त्यांना दाद दिली नाही. भूखंडाचे कब्जापत्र करून देण्यासही टाळाटाळ केली. त्यामुळे खापर्डे यांनी २४ सप्टेंबर २०१६ रोजी डेव्हलपर्सला कायदेशीर नोटीस बजावली. डेव्हलपर्सने त्यालादेखील उत्तर दिले नाही. परिणामी, खापर्डे यांनी ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल करून ३ लाख ८५ हजार रुपये २५ मार्च २०१३ पासून १८ टक्के व्याजासह परत मिळण्याची आणि शारीरिक-मानसिक त्रासाकरिता दोन लाख व तक्रारीच्या खर्चापोटी ५० हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली होती. मंचने विविध बाबी लक्षात घेता हा निर्णय दिला.निर्णयातील निष्कर्षडेव्हलपर्सने बहुतांश रक्कम स्वीकारूनही भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून दिले नाही. ही कृती सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करणारी दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्ता ग्राहक भूखंडाची रक्कम व्याजासह परत मिळण्यास आणि शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाकरिता योग्य भरपाई मिळण्यास पात्र आहे असा निष्कर्ष मंचने निर्णयात नोंदवला आहे.

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे