शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कलावंत घडविणारा ऑर्केस्ट्राचा शोमॅन निखळला : ओ.पी.सिंग यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:51 AM

सुनील पाल हा तरुण हिंगणघाट सोडून नागपूरला आला तेव्हा ओ.पी. सिंग हे एकच नाव त्याला माहिती होते. शहरात लहानमोठी कामे करताना त्यांच्या ऑर्केस्ट्रात मिमिक्री करण्याची संधी मिळावी, ही एकच ईच्छा त्याच्या मनात होती. ओ.पी. यांनीही त्याला निराश होऊ दिले नाही. आज सुनील पाल या नावाला देशात कॉमेडीचे मोठे वलय प्राप्त झाले आहे. ऐहसान कुरैशी हेही त्यातीलच एक नाव. हेच नाही तर ज्युनियर शाहरुख खान म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखला जाणारा प्रशांत वालदे, नृत्य दिग्दर्शक संजय यादव, विजय अमीन, मालिका अभिनेत्री मिताली नाग व गीतसंगीत, अभिनय व कला क्षेत्रातील अशी असंख्य नावे आहेत ज्यांचे करिअर ओ.पी. सिंग यांनी घडविले. असे कलावंत घडविणारा मध्य भारतातील ऑर्केस्ट्राचा शोमॅन म्हणून ओळखला जाणारा ओमप्रकाश शिवकुमार ऊर्फ ओ.पी. सिंग नावाचा तारा आज हरविला. 

ठळक मुद्देसुनील पाल, ऐहसान कुरैशीसह अनेकांना दिली ओळख

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुनील पाल हा तरुण हिंगणघाट सोडून नागपूरला आला तेव्हा ओ.पी. सिंग हे एकच नाव त्याला माहिती होते. शहरात लहानमोठी कामे करताना त्यांच्या ऑर्केस्ट्रात मिमिक्री करण्याची संधी मिळावी, ही एकच ईच्छा त्याच्या मनात होती. ओ.पी. यांनीही त्याला निराश होऊ दिले नाही. आज सुनील पाल या नावाला देशात कॉमेडीचे मोठे वलय प्राप्त झाले आहे. ऐहसान कुरैशी हेही त्यातीलच एक नाव. हेच नाही तर ज्युनियर शाहरुख खान म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखला जाणारा प्रशांत वालदे, नृत्य दिग्दर्शक संजय यादव, विजय अमीन, मालिका अभिनेत्री मिताली नाग व गीतसंगीत, अभिनय व कला क्षेत्रातील अशी असंख्य नावे आहेत ज्यांचे करिअर ओ.पी. सिंग यांनी घडविले. असे कलावंत घडविणारा मध्य भारतातील ऑर्केस्ट्राचा शोमॅन म्हणून ओळखला जाणारा ओमप्रकाश शिवकुमार ऊर्फ ओ.पी. सिंग नावाचा तारा आज हरविला. 

मेलोडी मेकर्स ऑर्केस्ट्राचे सर्वेसर्वा ओ.पी. यांचे शनिवारी वयाच्या ७० वर्षी निधन झाले. ओपी यांचा आॅर्केस्ट्राचा प्रवास थक्क करणारा. १९४९ मध्ये त्यावेळी सी.पी. अ‍ॅन्ड बेरार राज्यात तुमसरजवळच्या लेंडेझरी या गावी त्यांचा जन्म झाला. कुटुंब सुशिक्षित होते व त्यांनीही प्राणीशास्त्रात एमएससी केले होते. त्यामुळे त्यांनी नोकरी करावी अशी घरच्यांची इच्छा. त्यांना मात्र व्यवसाय करायचा होता. त्यासाठी गाव सोडून ते नागपूरला आले व अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी सुरू केली. त्यांची पत्नी मिमिक्री कलावंत होती. त्यांनी या क्षेत्रात काही करण्याचा आग्रह केला. गीतसंगीताची आवड आधीपासून होतीच. कोणतेही भांडवल नसताना १९७१ साली त्यांनी मेलोडी मेकर्स आर्केस्ट्राची सुरुवात केली. स्टेज शोद्वारे त्यांचे कार्यक्रम सुरू झाले आणि अल्पावधीतच मेलोडी मेकर्स आणि ओ.पी. सिंग हे नाव मध्य भारतात गाजू लागले. त्यावेळी एम.ए. कादर या दिग्गज कलावंताच्या ऑर्केस्ट्राचा दबदबा होता. मात्र ओपी यांनीही आपले स्थान निर्माण केले. चित्रपटाशिवाय मनोरंजनाचे साधन नसल्याने या ऑर्केस्ट्रांनी रसिकांमध्ये धूम केली होती. त्यांच्या तारखा मिळणेही मुश्किल व्हायचे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यात हजारो कार्यक्रम त्यांनी गाजवले.ऑर्केस्ट्रा जगतात सर्वात मोठी उणीव भासली ती व्यावसायिक बांधणीची. इतर व्यवसाय जसे ऑर्गनाईज्ड असतात तसे नागपुरातील ऑर्केस्ट्रा संच हे सुव्यवस्थित नव्हते. घरात, दुकानात, मैदानात अगदी कुठेही ऑर्केस्ट्राचा सराव व्हायचा.नागपुरात ऑर्केस्ट्राचे पाहिले अधिकृत आॅफिस, अत्याधुनिक प्रॅक्टीस रूम, आधुनिक ध्वनिव्यवस्था, प्रकाशव्यवस्थेसह बर्डी येथील नेताजी मार्केट येथे ओ.पी.सिंग यांनी केले. मेलोडी मेकर्सने साडेचार दशकात अनेक नवीन कलावंतांना मंच दिला. शहरातील ७० टक्के गायक-वादक, ध्वनी संयोजक, प्रकाश संयोजक, मिमिक्री आर्टिस्ट, नृत्यांगना अशा कलावंतांना मेलोडी मेकर्सने घडविले. लाईट, साऊंड, नृत्य, प्रोजेक्टर यांचा प्रभाव श्रोत्यांना भारावून टाकायचा. त्यामुळे त्यांना आर्केस्ट्राचे शोमॅन म्हणून ओळख प्राप्त झाली. ते स्वत: मिमिक्री आर्टिस्ट होते. नागपूर महापालिकेच्या पहिल्या ‘नागपूर महोत्सवा’ची विशेष जबाबदारी त्यांच्यावरच सोपविली होती. ओ.पी.सिंग यांनी नर्गिस, आशा पारेख, राजेंद्र कुमार, अमिताभ बच्चन, हेलन आदी दिग्गज कालावंतांसोबत कार्यक्रम केले. ते राजपूत चेतना मंचसह महापालिका बाजार असोसिएशन व नेताजी मार्केट संघाचे अध्यक्षही होते. या कलावंताने शनिवारी एक्झिट घेऊन सर्वांनाच धक्का दिला. गेल्या काही महिन्यांपासून ते लिव्हर सिरॉसिसमुळे आजारी होते. गेल्या सहा दिवसांपासून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. नागपुरातील समस्त कलाजगतमध्ये त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.अंत्ययात्रा रविवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या जोशीवाडी, सीताबर्डी येथील निवासस्थानाहून निघून मोक्षधाम घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूर