शतकांच्या वाटेवर उसळे एक केशरी ज्वाला, अरुणोदय झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:22 IST2021-02-20T04:22:37+5:302021-02-20T04:22:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शतकांच्या दमणातून उसळली, जी केशरी ज्वाळा.. तिचे नाव शिवबा. शिवनेरीवर जन्मलेला हा बालक पुढे ...

An orange flame erupted over the centuries, dawning | शतकांच्या वाटेवर उसळे एक केशरी ज्वाला, अरुणोदय झाला

शतकांच्या वाटेवर उसळे एक केशरी ज्वाला, अरुणोदय झाला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शतकांच्या दमणातून उसळली, जी केशरी ज्वाळा.. तिचे नाव शिवबा. शिवनेरीवर जन्मलेला हा बालक पुढे बेजान जमिनीवरही हिरवी पालवी फुलवणारा ठरला. एका अर्थी निस्तेज पडलेल्या जनमाणसात अस्तित्वाची जाण करवता झाला. आपल्या बुद्धिकौशल्याने, रणतेजाने आणि शत्रूसम शत्रूंच्याच चालीने शत्रूला नामोहरम करताना हिंदवी स्वराज्य अर्थाने जनतेचे राज्य उभे करणारा हा योद्धा म्हणजे निश्चयपूर्तीचा महामेरू, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज होय. महाराजांची जयंती शासकीय तिथीनुसार शुक्रवारी नागपुरात ठिकठिकाणी साजरी झाली. व्याख्याने, पोवाडे, अंगाई गीते, रॅली आदींनी हा सोहळा नेत्रदीपक करण्याचे प्रयत्न शिवभक्तांनी केले. कोरोनाचा वाढता प्रकोप म्हणून अनेक ठिकाणचे नियोजित कार्यक्रम स्थगित करून हा सोहळा साधेपणानेही साजरा करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला.

वामनराव बरडे स्मृती प्रतिष्ठान ()

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा, पश्चिम नागपूर व वामनराव बरडे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी छत्रपती शिवराजांचा जन्मोत्सव सोहळा फ्रेण्ड्स कॉलनी येथे साजरा करण्यात आला. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नरेश बरडे होते. यावेळी भाजप पश्चिम नागपूर मंडळचे अध्यक्ष विनोद कान्हेरे, शहरमंत्री सतीश वडे, माजी नगरसेविका साधना बरडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी साधनाताई जुडो-कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांनी राहून यादव यांच्या मार्गदर्शनात प्रात्याक्षिके सादर केली. आभार भाजप ओबीसी आघाडीचे संपर्कप्रमुख सुरेश कोंगे यांनी मानले. यावेळी गोपाल बावनकुळे, शशिकांत हरडे, अरुण धारपुरे, ज्ञानेश्वर ससनकर, सुरेश कालभूत, डॉ. जगन चौधरी, अतीप सिंग, अभय खोरगडे, देवेंद्र बरडे, महेश अलघरे, स्वदेश कुमार गुप्ता, जया सावरकर, राजन गर्ग, कृष्णा सातनकर, जगदीश विरखेडे, विजय अडाणे, नितीन कडवे, प्रकाश वानखेडे, नानेश्वर कडव, अथांग श्रोते, श्वेता पांडे, शुभम अलघरे उपस्थित होते.

Web Title: An orange flame erupted over the centuries, dawning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.