शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
2
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
3
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
4
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
5
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
6
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
7
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
8
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
9
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
10
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
11
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
12
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
13
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
14
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
15
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
16
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
17
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
18
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
19
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
20
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर

संत्रा, मोसंबी उत्पादकांची दरवर्षी २२५ कोटी रुपयांनी लूट

By सुनील चरपे | Updated: July 28, 2025 15:09 IST

१० टक्के काट व ७ टक्के कमिशन : नागपूरच्या कळमना बाजार समितीतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना (नागपूर) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये संत्रा व मोसंबीच्या खरेदीवर व्यापारी शेतकऱ्यांकडून प्रतिटन एक क्विंटल म्हणजेच १० टक्के काट आणि सात टक्के कमिशन घेतात. हा प्रकार मागील २५ वर्षापासून सुरू आहे. या बाजार समितीत व्यापारी दरवर्षी सरासरी ३ लाख ५० हजार टन संत्रा व २ लाख ७५ हजार टन मोसंबी शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. १० टक्के काट विचारात घेता शेतकऱ्यांची १५० कोटी रुपये व सात टक्के कमिशनपोटी १०५ कोटी रुपयांची लूट सुरू आहे.

व्यापारी कळमना मार्केटमधील शेतकऱ्यांकडून ११ क्विंटल संत्रा व मोसंबी खरेदी करतात आणि १० क्विंटल (एक टन) चे पैसे देतात. सोबतच एकूण रकमेवर सात ते आठ टक्के कमिशन घेतात. हा प्रकार मागील २५ वर्षापासून सुरू आहे. पूर्वी पाच टक्के म्हणजे १० क्विंटलवर ५० किलो काट घेतला जायचा. सोबतच कमिशनदेखील कमी होते. सन २०१५ पासून एक क्विंटल काट व सात ते आठ टक्के कमिशन घेणे सुरू झाले. जेव्हापासून वजनाने संत्रा, मोसंबी खरेदी करणे सुरू झाले, तेव्हापासून हा प्रकार सुरू झाला, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. या संपूर्ण व्यवहाराची एसआयटीमार्फत स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे आहे.

पणन संचालकांकडे तक्रारकाट व कमिशनबाबत डिसेंबर २०२४ मध्ये कळमना बाजार समितीच्या सभागृहात पणन संचालक रसाळ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यात संत्रा व मोसंबी उत्पादकांच्या १०० प्रतिनिधींनी आ. डॉ. आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत रसाळ यांच्याकडे तक्रार करत हा प्रकार बंद करून कारवाईची मागणी केली. मात्र, काहीच कारवाई करण्यात आली नाही. 

लुटीचा हिशेब

  • संत्रा व मोसंबीचे सरासरी दर २५ हजार रुपये प्रतिटन आणि १० टक्के काट म्हणजेच प्रत्येकी ३० हजार टन संत्रा व मोसंबी विचारात घेतल्यास ही रक्कम प्रत्येकी ७५ कोटी रुपयांप्रमाणे १५० कोटी रुपये होतात.
  • संत्रा व मोसंबीच्या एकूण रकमेवरील सात ते आठ टक्के कमिशन विचारात घेतले तर ही रक्कम १०५ कोटी रुपयांवर जाते. दोन्ही मिळून ही लूट २२५ कोटी रुपयांवर पोहोचते. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही.

शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यावीशेतकरी एकमुस्त संत्रा, मोसंबी विकायला आणतात. त्यात लहान, मध्यम व मोठ्या आकाराची फळे असतात. व्यापारी लहान व मध्यम आकाराच्या फळांवर लक्ष केंद्रित करून दर ठरवतात व नुकसान टाळण्यासाठी काट घेतात. शेतकऱ्यांनी स्वतःच बागेची विरळणी करून मोठ्या आकाराची फळे बाजारात विकावी. झाडांवरील छोटी व मध्यम फळे मोठी झाल्यानंतर ती बाजारात आणावी.

संत्र्याची खरेदीसन २०२३-२४ ३,४५,२६० टनसन २०२४-२५ ३,६७,२५२ टन

मोसंबीची खरेदीसन २०२३-२४ ३,०१,२९४ टनसन २०२४-२५ १,९६,६९४ टन

टॅग्स :nagpurनागपूर