‘महा ई-सेवा’ केंद्र ठरणार सेतूला पर्याय

By Admin | Updated: May 21, 2014 01:07 IST2014-05-21T01:07:34+5:302014-05-21T01:07:34+5:30

सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या वस्तीतच सेतू केंद्राच्या सुविधा मिळाव्या म्हणून शासनाने शहरात एकूण २८ ठिकाणी ‘महा ई-सेवा केंद्र’ सुरू केले आहे. विशेष म्हणजे या केंद्राच्या

Options for Setu, which will be the 'Great E-service' center | ‘महा ई-सेवा’ केंद्र ठरणार सेतूला पर्याय

‘महा ई-सेवा’ केंद्र ठरणार सेतूला पर्याय

 नागपूर : सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या वस्तीतच सेतू केंद्राच्या सुविधा मिळाव्या म्हणून शासनाने शहरात एकूण २८ ठिकाणी ‘महा ई-सेवा केंद्र’ सुरू केले आहे. विशेष म्हणजे या केंद्राच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवरही भर देण्यात आला आहे. सरकारी सेतू केंद्रातून विविध प्रमाणपत्रे तयार करून दिली जातात. मात्र या केंद्रात होणारी गर्दी आणि प्रमाणपत्र मिळण्यासाठी होणारा विलंब यामुळे गरजूंची गैरसोय होते. सरकारी कार्यालयात जाण्यायेण्यातही नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळेच शासनाने सेतू केंद्राच्याच सुविधा महा-ई-सेवा केंद्रात उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरात २८ तर ग्रामीण भागात ३८ केंद्र सुरू करण्यात आले असून या केंद्रातून सेतूमधूनच मिळणारी सर्व प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याची सोय करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या वस्तीतील केंद्रातूनच ही प्रमाणपत्रे मिळतील. जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयाकडे जाण्याची गरज भासणार नाही. प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया आॅनलाईन असली तरी महा-ई सेवा केंद्रात त्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले आहे. विविध प्रमाणपत्रांसोबतच या केंद्रातून विविध स्पर्धा परीक्षांचे आॅनलाईन अर्ज भरून देणे, वीज देयके स्वीकारणे आदी सेवाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातही विविध गावांमध्ये केंद्र सुरू करण्यात आल्याने तेथील नागरिकांना प्रमाणपत्रांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. ‘ई-डिस्ट्रिक्ट’ या योजनेंतर्गत जिल्ह्यात पाच तालुक्यात आॅनलाईन सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. विविध प्रमाणपत्रांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. डोमिसाईल, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, शपथपत्र, उत्पन्न आदी प्रमाणपत्रासाठी ३३ रुपये तर ७/१२ च्या उतारा, ८(अ) ,साठी २२.५० रु. जात आणि नॉन क्रिमिलिअरसाठी ५५ रुपये दर आकारणी या केंद्रात करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Options for Setu, which will be the 'Great E-service' center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.