शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांकडून समाजात दरी निर्माण करण्याचे प्रयत्न : राजनाथसिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 22:08 IST

आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाची पाने असलेल्या रामायण, महाभारताची रचना करणारे महर्षी वाल्मिकी व महर्षी व्यास हे अनुसूचित जाती-जमातीमधील होते. देशाच्या विकासात या समाजाचे मौलिक योगदान राहिले आहे. त्यांना सोबत घेतल्याशिवाय देश प्रगतीच्या शिखरावर पोहोचू शकत नाही. मात्र विरोधी पक्ष तसेच कॉंग्रेसकडून समाजामध्ये दरी निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. अनुसूचित जाती-जमातींमध्ये भाजपाविषयी भ्रामक माहितीचा प्रचार करण्यात येत आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लावला. भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात आयोजित विजयी संकल्प सभेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देजाहीर सभेतून घेतला विजयाचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाची पाने असलेल्या रामायण, महाभारताची रचना करणारे महर्षी वाल्मिकी व महर्षी व्यास हे अनुसूचित जाती-जमातीमधील होते. देशाच्या विकासात या समाजाचे मौलिक योगदान राहिले आहे. त्यांना सोबत घेतल्याशिवाय देश प्रगतीच्या शिखरावर पोहोचू शकत नाही. मात्र विरोधी पक्ष तसेच कॉंग्रेसकडून समाजामध्ये दरी निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. अनुसूचित जाती-जमातींमध्ये भाजपाविषयी भ्रामक माहितीचा प्रचार करण्यात येत आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लावला. भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात आयोजित विजयी संकल्प सभेदरम्यान ते बोलत होते.कस्तूरचंद पार्क येथे झालेल्या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक-जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष विनोद सोनकर, दुश्यंत गौतम, व्ही.सतीश, मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्यासह आमदार व विविध पदाधिकारी उपस्थित होते.गरिबी हटाओच्या नावाखाली कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्वत:चीच गरिबी हटविली. मात्र निवडणूक आली की त्यांना बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांची बरोबर आठवण येते. विरोधकांचे राजकारण भयाभोवतीच फिरते आहे. खोट्या गोष्टी समोर करुन अपप्रचार करण्यात येत आहे. दलित, मुस्लिम, वंचितांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्यात येत आहे, असा आरोप गडकरी यांनी लावला. धर्मपाल मेश्राम यांनी संचालन केले.कॉंग्रेसला हडपायची होती इंदू मिलची जागा : मुख्यमंत्रीइंदू मिल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे, ही कोट्यवधी जनतेची इच्छा आहे. मात्र संपुआ व आघाडी सरकारच्या कार्यकाळात स्मारकासाठी एक इंचही जमीन मिळाली नाही.कॉंग्रेसला तर इंदू मिलची जागा हडपायची होती, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. आमचे सरकार आल्यावर मी फाईल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेलो. त्यांनी संबंधित मंत्र्यांना बोलावून तीन दिवसात जमीन स्मारकासाठी मिळाली पाहिजे, असे निर्देश दिले व खरोखरच पुढील तीन दिवसात जागा मिळाली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. इंदू मिल येथे २०२० पर्यंत बाबासाहेबांचे स्मारक पूर्णत्वास येईल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.विदर्भवाद्यांची निदर्शनेदरम्यान, सभेदरम्यान काही विदर्भवादी कार्यकर्त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या कार्यकर्त्यांनी पत्रकेदेखील भिरकावली. सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. हे लोक कॉंग्रेसने पाठविले होते, असा आरोप यावेळी गडकरी यांनी केला.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपा