जॉन अब्राहम, वरुण, जॅकलीनशी भेटण्याची संधी

By Admin | Updated: June 23, 2016 02:19 IST2016-06-23T02:19:28+5:302016-06-23T02:19:28+5:30

लवकरच रिलिज होणारा हिंदी चित्रपट ‘ढिशूम’चे कलावंत नागपूरकरांशी भेटायला येत आहेत. यात अभिनेता जॉन

The opportunity to meet John Abraham, Varun, Jacqueline | जॉन अब्राहम, वरुण, जॅकलीनशी भेटण्याची संधी

जॉन अब्राहम, वरुण, जॅकलीनशी भेटण्याची संधी

नागपूर : लवकरच रिलिज होणारा हिंदी चित्रपट ‘ढिशूम’चे कलावंत नागपूरकरांशी भेटायला येत आहेत. यात अभिनेता जॉन अब्राहम, वरुण धवन व अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आहेत. या कलावंतांची नागपूरकरांसोबत भेट घालून देण्यासाठी लोकमतने शुक्रवार, २४ जूनला सायंकाळी ५.३० वाजता फुटाळा चौपाटीवर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचा मंच खुला असून, हे कलावंत थेट आपल्या फॅनशी भेटणार आहेत.
जॉन, वरुण व जॅकलीनच्या चाहत्यांना त्यांच्याशी थेट घेण्यासाठी लोकमततर्फे ‘ढिशूम मोमेंट’ या आकर्षक स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यासाठी चाहत्यांनी आपल्या जीवनातील ढिशूम क्षणाचा एक फोटो लोकमतच्या फेसबुक पेजवर टॅग करावा. अशा चाहत्यांना या कलावंतांशी भेटण्याची खास संधी मिळणार आहे. हे तिघेही नागपूरकरांच्या खास भेटीसाठी येत आहेत. त्यामुळे शुक्रवारची संध्याकाळ फुटाळा चौपाटीवर शानदार राहणार आहे. या क्षणाचा आनंद लुटण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The opportunity to meet John Abraham, Varun, Jacqueline